दक्षिण भारतातील ‘या’ सुंदर हिल स्टेशनला नक्की भेट द्या
सध्या वसंत ऋतू सुरु आहे. या दिवसांमध्ये पर्यटनाचे नियोजन करीत असाल तर, दक्षिण भारतातील अनेक हिल स्टेशनचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही विविध एडव्हेंचर खेळाचे प्रकारही अनुभवू शकाल.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. रोजच्या कोरोना केसेस कमी होत असल्याने अनेक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे लोक आता मुक्तपणे देशाअंतर्गत तसेच परदेशातील पर्यटनाचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. वसंत ऋतु (spring season) हा पर्यटनासाठी चांगला असतो. त्यात आपल्या देशातील निर्सगाचे सौंदर्य (Natural beauty) पाहण्यासाठी वसंत ऋतुशिवाय पर्याय नाही. बहरणारा सूर्यप्रकाश, सुंदर फुले आणि या ऋतूतील पक्ष्यांचा किलबिलाट अतिशय आकर्षक आहे. तुम्ही पर्यटन करण्याचे नियोजन करीत असाल तर, हा सीझन तुमच्यासाठी योग्य ठरेल. उत्तर ते दक्षिण भारतातील अनेक ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन या दिवसांमध्ये करु शकता. आज या लेखात आपण दक्षिण भारतातील अशा काही हिल स्टेशन्सबद्दल (Hill Station) माहिती जाणून घेणार आहोत, जिथे पर्यावरणाची सुंदर तुम्हाला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहणार नाही.
कुर्ग, कर्नाटक
कुर्ग हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. वसंत ऋतूमध्ये हे ठिकाण आणखीनच सुंदर बनते. इथे मैदानी भागात गाडी चालवणे आणि वसंताची ताजी व शुध्द हवेला चेहऱ्यावर घेणे हा एक वेगळाच अनुभव आहे. कूर्ग हे सुट्टी घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
वागामोन, केरळ
वागामोन हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. पण याशिवाय तुम्ही इतर अनेक गोष्टींचा अनुभव त्या ठिक़ाणी घेऊ शकता. येथे तुम्ही साहसी खेळ खेळू शकतात. वसंत ऋतूत पॅराग्लायडिंगचा आनंद वेगळाच असतो. या दरम्यान टेकड्या अतिशय सुंदर दिसतात.
कुन्नूर, तामिळनाडू
हे तामिळनाडूमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. वसंत ऋतूमध्ये नव्याने बहरलेली फुले अतिशय आकर्षक दिसतात. या मुळे हे हिलस्टेशन पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र ठरत असते. या सुंदर ठिकाणच्या उंच टेकड्या पर्यटकांना मोहून टाकतात.
अराकू व्हॅली, आंध्र प्रदेश
अराकू हे आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अराकू व्हॅलीमध्ये आदिवासी संस्कृतींसह इतरही अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. कॉफी प्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे तुम्ही फिरायला जाऊ शकता.
मुन्नार, केरळ
मुन्नारच्या चहाच्या बागा आणि टेकड्यांचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी वसंत हा एक चांगला ऋतू आहे. येथे तुम्हाला आजूबाजूची हिरवळ पाहायला मिळेल. वसंत ऋतु येथे भेट देण्यासाठी चांगला काळ आहे. सुट्ट्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी जाण्याचा विचारही करू शकता.
संबंधीत बातम्या :
आम्ही लग्नाळू ! काही केलं तरी लग्न जमतं नाही ? मग हे वास्तू उपाय नक्की करुन पाहा, विवाह योग नक्की