सतत होते चिडचिड ? हे पदार्थ वाढवतील हॅपी हार्मोन्स !

आपण काय खातो, याचा आपल्या मूडवर पण बराच प्रभाव पडतो. जर तुमची सतत चिडचिड होत असेल तर मूड सुधारण्यासाठी काही पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

सतत होते चिडचिड ? हे पदार्थ वाढवतील हॅपी हार्मोन्स !
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : आपला मूड कसा आहे याचा फक्त आपल्या आरोग्यावरच नव्हे तर आसपासच्या लोकांवरही परिणाम होता. म्हणजे तुम्ही छान, रिलॅक्स मूड (relax mood) मध्ये असाल तर सगळ्यांनाच आवडता पण जर तुमची सतत चिडचिड होत असेल, किंवा दु:खी रहात असाल तर लोक तुमच्यापासून दूर राहणंच पसंत करतात. कधीकधी काही प्रॉब्लेम्समुळे मूड खराब होतो, पण खराब मूडची ही समस्या कायम असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे ठरते. मूड चांगला (good mood) ठेवण्यासाठी, दैनंदिन दिनचर्या तर सुधारायला हवीत पण त्यासोबतच काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.

खरंतर, आपला मूड हा हार्मोन्सशी देखील संबंधित असतो. जेव्हा आपण कोणतही आवडतं काम करतो, तेव्हा डोपामाइन हार्मोन बाहेर पडतं, ज्यामुळे आपल्याला तणावापासून आराम मिळतो, रिलॅक्स वाटतं. तसंच काही पदार्थ खाल्ल्याने सेरोटोनिन वाढते जे मन शांत ठेवण्यास मदत करते. कोणते पदार्थ खाल्ल्याने मूड फ्रेश राहू शकतो, ते जाणून घेऊया.

डार्क चॉकलेट

शरीरात हॅपी हार्मोन्स वाढवायचे असतील तर डार्क चॉकलेट खाणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स आपला मूड सुधारण्यास मदत करतात. पण ते एका ठराविक प्रमाणातच खावे.

ड्राय फ्रुटस आणि बिया

बदाम, शेंगदाणे, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, भोपळ्याच्या बिया यासारखे ड्रायफ्रुट्स आणि बिया यांचा आहारारत समावेश करावा. त्यामुळे सेरोटोनिनचे उत्पादन वाढते, ते आपला मूड सुधारण्यास मदत करते. तसेच या पदार्थांच्या सेवनाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

पालक

मॅग्नेशियम आणि लोहासारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पालकाचा आहारात समावेश करणे अतिशय फायदेशीर ठरते. कधीकधी मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे चिंता आणि तणावासारख्या समस्या देखील उद्भवतात. पालक खाल्ल्याने सेरोटोनिनची पातळी सुधारते, ज्यामुळे मूड सुधारतो.

सफरचंद

सफरचंद हे केवळ हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम नाही तर त्यामुळे आपला मूडही सुधारू शकतो. मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील सफरचंदाचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.