AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात दिसायचंय कूल, एलिगंट ? हे रंग आणि कपडे वापरून तर बघा..

उन्हाळ्यात शक्यतो असे कपडे घालावेत ज्यामुळे आपला लूक चांगला दिसतो, पण ते कपडे आरामदायीही असावेत. उन्हाळ्यात लूक चांगला ठेवायचा असेल तर कोणत्या कपडे आणि हे रंग तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करू शकता ते जाणून घेऊया.

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात दिसायचंय कूल, एलिगंट ? हे रंग आणि कपडे वापरून तर बघा..
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 3:19 PM

Summer Fashion Tips : उन्हाळा आता आपल्या दारापाशीच पोहोचला आहे. त्यामुळेच अनेक घरात थंडीचे कपडे पुन्हा कपाटात गेले असून, उन्हाळ्याता वापरण्यासाठी हलके फुलके कपडे बाहेर काढण्यात आले आहेत. काहींनी तर उन्हाळ्यासाठी स्टायलिश कपड्यांची खरेदीही सुरू केली असेल. कडक ऊन आणि अशा वातावरणात तुमचा लूक सुधारेल आणि त्यासोबतच तु्म्हाला कंफर्टेबलही वाटेल, अशा कपड्यांची निवड केली पाहिजे. त्यामुळे कपडे खरेदी करताना, हे लक्षात ठेवा की स्टाईल आणि ट्रेंडिंग व्यतिरिक्त,कपड्यांचा रंग आणि गुणवत्ता याकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्यात तुमचा लूक सुधारेल आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अशाच कपड्यांची निवड करा.

आज आपण अशा रंगांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही या सीझनमध्ये वापरू शकता. खरंतर रंगांबाबत प्रत्येकाची स्वतःची आवड असते. पण उन्हाळ्यात हलके आणि पेस्टल रंगाचे कपडे जास्त परिधान केले जातात. चला मग जाणून घेऊया की उन्हाळ्यात कोणते रंग आणि कसे कापड वापरणे , जास्त छान दिसते.

हिरवा आणि पिवळा

फिकट पिवळा, लिंबू कलर किंवा हिरवा, अशा रंगांची तुम्ही निवड करू शकता. अशा रंगांचे कपडे उन्हाळ्यात डिसेंट दिसतात. विशेषत: जर तुम्हाला ड्रेस किंवा कुर्ती घालणे आवडत असेल तर हा रंग तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.

पेस्टल कलर

तुम्ही कोणत्याही पेस्टल रंगाचे कपडे घालू शकता. यामुळे तुमचा लुक सोबर आणि परफेक्ट दिसतो. जर तुम्हाला या रंगांचा ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही त्यासोबत ऑर्गेन्झा दुपट्टा वापरू शकता. जे सूटमधील तुमचा लुक आणखी सुधारण्यास मदत करू शकतात.

लव्हेंडर आणि निळा

बहुतांश महिलांना हा रंग खूप आवडतो आणि त्या रंगाच्या अनेक रेंज बाजारात उपलब्ध असतात.त्यामुळे या रंगाचे कपडे तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करू शकता. तुम्हाला अतिशय क्लासी आणि एलीगेंट लूक मिळण्यास मदत होईल.

कापड कसे निवडाल ?

कॉटन

उन्हाळ्यात कॉटनचे किंना सुती कपडे घालणे हा एक चांगला पर्याय आहे. कारण ते घाम शोषण्यात सर्वात प्रभावी ठरतात. बहुतेक लोकांना हे कापड परिधान केल्यावर कोणताही त्रास होत नाही. जेव्हा तुम्ही सुती कपडे घेण्यासाठी बाजारात जाता. तिथे तुम्हाला या कापडाचे अनेक प्रकार मिळतील. प्युअर कॉटनमध्ये तुमचा लुक रॉयल आणि वेगळा दिसेल.

रेयॉन

उन्हाळ्यात, कपड्यांसाठी रेयॉन फॅब्रिक हा देखील एक चांगला पर्याय आहे. हे कापड घाम योग्य प्रकारे शोषून घेते. यासोबतच त्याचे फिटिंगही खूप चांगले बसते. रेयॉचे कपडे अनेक रंगात सहज उपलब्ध असतात. जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करून घेऊ शकता किंवा या फॅब्रिकमध्ये रेडिमेड ड्रेस घेऊ शकता.

लिनन

उन्हाळ्यात परिधान केल्या जाणाऱ्या, हलक्या कपड्यांमध्ये लिनन फॅब्रिकचा देखील समावेश आहे. हे कापड किंवा त्यापासून बनवलेले ड्रेस तुम्हाला मार्केटमध्ये अनेक रेंजमध्ये उपलब्ध असलेले दिसतील. त्यात पेस्टल शेड्स, रंग खूप सुंदर दिसतील. विशेषत: या कापडाची कुर्ती शिवली, तर ती खूप सुंदर दिसेल.

शिफॉन आणि जॉर्जेट

उन्हाळ्यात परिधान केल्या जाणाऱ्या, हलक्या कपड्यांमध्ये शिफॉन आणि जॉर्जेटही चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात जॉर्जेटचे कापड परिधान केल्यास तुम्हाला हलकं वाटेल. हे दोन्ही फॅब्रिक्स बाजारात अनेक रेंजमध्ये उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते खरेदी करू शकता.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.