मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नक्की बनवा ‘हे’ 5 पदार्थ, आरोग्यासाठी देखील ठरतील लाभदायक
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर फक्त बनवताय तिळाचे लाडू... तर 'हे' चार पदार्थ देखील यंदाच्या वर्षी नक्की बनवा, कुटुंबियांसाठी ठरेल लाभदायक, कोणते आहेत ते पाच पदा पदार्थ नक्की जाणून घ्या...
Makar Sankranti 2024 : यंदाच्या वर्षी सोमवारी म्हणजे 15 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गोड पदार्थ बनवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या सणाच्या निमित्ताने साध्या खिचडीपासून ते गूळ आणि तिळापासून बनवलेल्या अतिशय चविष्ट लाडूंपर्यंत विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी घरात बनवलेल्या पदार्थांची तव देखील स्वादिष्टच असते. पदार्थ चवदार तर असतातच शिवाय आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू तर अनेक जण बनवतात, पण काही हेल्दी आणि चविष्ट पदार्थ घरी बनवल्याने त्याचा फायदा आरोग्याला देखील होता… जाणून घेऊ अशाच पाच पदार्थांबद्दल…
गोड भात : मकर संक्रांतीच्या दिवशी बाहेरून काहीही खाण्यापेक्षा घरी गोड गुळाचा भात तयार करून खा. मकर संक्रांतीचा सण हिवाळ्यात येतो. हिवाळ्यात गुळाचं सेवन करणं प्रचंड फायदेशीर असतं. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्ही गुळाचा भात तयार करून गरम दूध किंवा तुपासोबत खाऊ शकता.
गुळाचा हलवा : गूळ आणि पिठाची खीर तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते, जी हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करते. सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून तुमची सुटका मिळवण्यासाठी गुळाचा हलवा लाभदायक ठरतो. थंडीच्या दिवसात गुळाचा हलवा खाणे फायदेशीर ठरते.
तिळाचे लाडू : मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू अनेक जण बनवतात. तिळाचे लाडू चवीला आणि आरोग्यासाठी देखील लाभदायक असतात. तिळाच्या लाडूमध्ये लोहासह अनेक पोषक घटक असतात.
तिळाची पापडी : हिवाळ्यात तिळाची पापडी खाणं लाभदायक ठरतं. शेंगदाणे, तीळ आणि गुळापासून तिळाचे लाडू बनवले जातात. हिवाळ्यात तिळाची पापडी आयोग्यास फार लाभदायक ठरते. एवढंच नाही तर, तुम्ही तिळाच्या पापडीमध्ये ड्राय फ्रूट्स देखील घालू शकता.
पूरणपोळी : महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील लोकांना पुरणपोळी खूप आवडते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पुरणपोळी देखील तयार केली जाते. पूरणपोळी आरोग्यासाठीही खूप चांगली आहे. तुम्हीही मकर संक्रांतीच्या निमित्ताने काही स्वादिष्ट बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुरणपोळी बनवू शकता.