Zika virus: शास्त्रज्ञांनी शोधला ‘झिका व्हायरस’ शोधूण काढणारा नवीन स्मार्टफोन ‘क्लिप-ऑन’ ;जाणून घ्या, काय आहे संशोधन!

Zika virus: रक्ताच्या एका थेंबासह झिका विषाणूची जलद चाचणी करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये क्लिप करता येणारे उपकरण विकसित करण्यासाठी संशोधकांची एक टीम काम करत आहे. जाणून घ्या, काय आहे संशोधन.

Zika virus: शास्त्रज्ञांनी शोधला ‘झिका व्हायरस’ शोधूण काढणारा नवीन स्मार्टफोन ‘क्लिप-ऑन’ ;जाणून घ्या, काय आहे संशोधन!
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 11:11 PM

कोरोनाव्हायरस आणि मंकीपॉक्ससोबतच देशात झिका व्हायरसचाही धोका (risk of the Zika virus) वाढला आहे. झिकाचीही अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे. रक्ताच्या एका थेंबासह झिका विषाणूची जलद चाचणी करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये क्लिप (Clip in smartphone) करता येणारे उपकरण विकसित करण्यासाठी संशोधकांची एक टीम काम करत आहे. झिका विषाणूचा संसर्ग सध्या प्रयोगशाळेत केलेल्या पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन (Polymerase chain reaction) चाचण्यांद्वारे शोधला जातो. ज्यामुळे विषाणूची अनुवांशिक सामग्री वाढू शकते. ज्यामुळे वैज्ञानिकांना ते शोधता येते. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, यूएसमधील अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठाचे ब्रायन कनिंगहॅम म्हणाले, “आम्ही एक क्लिप-ऑन डिव्हाइस डिझाइन केले आहे जेणेकरून स्मार्टफोनच्या मागील कॅमेर्‍याला विषाणू दिसू शकेल.” कनिंगहॅम म्हणाले की, जेव्हा रिपोर्ट पॉझीटिव्ह असतो, तेव्हा तुम्हाला फ्लूरोसेन्सचे छोटे हिरवे फुले दिसतात जे शेवटी संपूर्ण हिरव्या प्रकाशाने भरतात.

विषाणू शोधण्यासाठी सामग्री

नवीन अभ्यासात, संशोधकांनी पॉइंट-ऑफ-केअर क्लिनिकसाठी योग्य दृष्टीकोन वापरून रक्ताच्या नमुन्यांमधील विषाणू शोधण्यासाठी एक डिवाईस वापरले. PCR ला अनुवांशिक सामग्री वाढवण्यासाठी तापमानात 20 ते 40 वारंवार बदल करावे लागतात. तर, LAMP ला फक्त 65 °C तापमानाची आवश्यकता असते, ज्यामुळे ते नियंत्रित करणे सोपे होते. याव्यतिरिक्त, पीसीआर चाचण्या दूषित घटकांसाठी, विशेषत: रक्ताच्या नमुन्याच्या इतर भागांसाठी अत्यंत संवेदनशील असतात. परिणामी, नमुना वापरण्यापूर्वी ते शुद्ध केले जाते. दुसरीकडे, LAMP ला अशा कोणत्याही शुद्धीकरण चाचणीची आवश्यकता नाही.

रीपोर्ट पॉझीटीव्ह असल्यास, रंग होतो हिरवा

एक डीवाईस, ज्यामध्ये व्हायरस शोधण्यासाठी आवश्यक क्षमता असतात, ते उपकरणामध्ये घातले जाते, ते उपकरण स्मार्टफोनवर क्लिप केले जाते. एकदा रुग्णाने रक्ताचा एक थेंब घेतला की, रसायनांचा संच पाच मिनिटांत विषाणू आणि रक्तपेशी नष्ट करतो. डीवाईस अंतर्गत एक हीटर ते 65 डिग्री सेल्सियस पर्यंत गरम करतो. रसायनांचा दुसरा संच नंतर विषाणूजन्य अनुवांशिक सामग्री वाढवतो आणि जर रक्ताच्या नमुन्यात झिका विषाणू असेल तर डीवाईसमधील द्रव चमकदार हिरवा होतो. संपूर्ण प्रक्रियेस 25 मिनिटे लागतात. संशोधक आता एकाच वेळी इतर डासांपासून पसरणारे विषाणू शोधण्यासाठी समान तंत्रज्ञान विकसित करत आहेत आणि डीवाईसचा आकार आणखी लहान बनवण्यावर काम करत आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.