नांदेडमध्ये लोकसभेसाठी ‘भावोजी विरुद्ध मेहुणा’ लढत?

नांदेड : लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. अनेक संभाव्य उमेदवारांनी तयारीही सुरु केली आहे. नांदेडमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. नांदेडमधून काँग्रेसकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना त्यांचेच मेहुणे म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून भास्करराव पाटील खतगावकर हे […]

नांदेडमध्ये लोकसभेसाठी 'भावोजी विरुद्ध मेहुणा' लढत?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

नांदेड : लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. अनेक संभाव्य उमेदवारांनी तयारीही सुरु केली आहे. नांदेडमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. नांदेडमधून काँग्रेसकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना त्यांचेच मेहुणे म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून भास्करराव पाटील खतगावकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर तिकडे काँग्रेसकडून विद्यमान खासदार असलेल्या अशोक चव्हाण यांची उमेदवारीही जवळपास निश्चित आहे.

भास्करराव पाटील खतगावकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मात्र, आता ते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे मोठे मेहुणे असलेल्या खतगावकर यांनी आज आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला जिल्ह्याभरातील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खतगावकरांच्या मेळाव्याला मोठं महत्त्व आलं असून, तशी जिल्ह्याभरात चर्चा सुद्धा सुरु झाली आहे.

आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे पक्षाकडे (भाजप) आपण सांगितलं आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू., असे खतगावकर यांनी सांगीतलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत मेहुण्या-भावोजीची रंगतदार लढाई  पहायला मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे ते पुत्र होय. 2014 साली कथित मोदी लाटेदरम्यान राज्यात काँग्रेसच्या दोनच जागा आल्या. त्यात एक अशोक चव्हाणांची नांदेडमधून आली. अशोक चव्हाण हे सध्या महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे.

कोण आहेत भास्करराव पाटील खतगावकर?

भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपचे वरिष्ठ नेते असून, प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तीनवेळा खासदार आणि तीनवेळा आमदार राहिलेले खतगावकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत. मात्र, सध्या खतगावकर आणि अशोक चव्हाण हे कट्टर विरोधक मानले जातात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.