AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डी लोकसभा : भाजप, शिवसेना आणि आघाडी यांच्या तिरंगी लढतीची शक्यता

शिर्डी : लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. पूर्वाश्रमीचा कोपरगाव म्हणजेच आताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ.. 2009 सालच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर साईबाबा संस्थानचे तत्कालीन सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत रिपाई नेते रामदास आठवले यांचा मोठ्या […]

शिर्डी लोकसभा : भाजप, शिवसेना आणि आघाडी यांच्या तिरंगी लढतीची शक्यता
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

शिर्डी : लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. पूर्वाश्रमीचा कोपरगाव म्हणजेच आताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ.. 2009 सालच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर साईबाबा संस्थानचे तत्कालीन सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत रिपाई नेते रामदास आठवले यांचा मोठ्या फरकाने पराभव करून राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. 2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेला ऐनवेळी जय महाराष्ट्र करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अवघ्या 15 दिवसांच्या प्रचारात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे सव्वा लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आले. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

अगदी सुरुवातीला दिवंगत अण्णासाहेब शिंदे आणि नंतर दिवंगत बाळासाहेब विखे-पाटील अशा दोन दिग्गजांनी संसदेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. शिंदे यांना प्रदीर्घ काळ केंद्रात मंत्रीपदाचीही संधी मिळाली. दिवंगत ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात या लोकसभा मतदारसंघानेच पहिल्यांदा स्वीकारलं. साखर कारखानदारी आणि सहकारी संस्थांच्या मजबूत पायावर काँग्रेसची पकड असलेल्या या मतदारसंघात अनपेक्षितरित्या भाजपने कधीकाळी या मतदारसंघात झेंडा रोवला. त्याला कारणीभूतही विखेच होते. राज्याच्या पातळीवर नेतृत्व करू शकतील अशा जिल्ह्यातील नेत्यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघाची आता राजकीय घडी पूर्णत: विस्कटली आहे.

माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड (राष्ट्रवादी) तसेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सध्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे असे काँग्रेसचे दोन नेते असताना मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे कमालीचे झुंजावे लागले. शिवसेनेने येथे सुरुवातीला माजी मंत्री बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यात त्यांना तीन वर्षांची शिक्षा झाली. त्यामुळे शिवसेनेला ऐनवेळी उमेदवार बदलावा लागला. शेवटच्या टप्प्यात सदाशिव लोखंडेंना उमेदवारी मिळाल्याने वेळही तुलनेने खूपच कमी मिळाला. मात्र वाकचौरे यांच्या विरोधात गेलेले जनमत हीच त्यांची जमेची बाजू ठरली आणि ते खासदार झाले.

पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय. दिवंगत काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदारसंघाचं नऊ वेळा प्रतिनिधित्व केलंय. मतदारसंघ फेररचनेत शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ  अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंना हरवलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांनी अवघ्या 15 दिवसांचा प्रचार करुन विजयश्री मिळवली होती.

शिवसेनेचे विद्यमान खासदार लोखंडे यांचा कमी असलेला जनसंपर्क पाहता शिवसेना लोखंडेंऐवजी बबनराव घोलप यांचे सुपुत्र आमदार योगेश घोलप यांच्या नावाचाही विचार करू शकते असं बोललं जातंय. पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2019 मध्येच स्पष्ट केलंय, की सदाशिव लोखंडे हेच 2019 साठी उमेदवार असतील. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने भाजपला या मतदारसंघात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. सध्या भाजपात असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव चर्चेत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिणेतून (अहमदनगर लोकसभा मतदारसंघ) लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे दक्षिणेला काँग्रेस, तर उत्तरेत राष्ट्रवादी अशी आदलाबदल होण्याचीही चर्चा जोर धरु लागली होती. मतदारसंघात बदल झाल्यास आघाडीकडून रिपाईला सोडचिठ्ठी दिलेले अशोक गायकवाड, साहित्यिक उत्तम कांबळे आणि भारद्वाज पगारे, उत्कर्षा रुपवते, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र आरक्षित शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी जागेची अदलाबदल करते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रचाराचे मुद्दे काय असतील?

शिर्डी मतदारसंघात सध्या निळवंडे धरणाच्या रखडलेल्या कालव्यांच्या कामावरुन राजकारण सुरू आहे. निळवंडे कालव्यांचा प्रश्न प्रस्थापित नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे. 182 गावांच्या पाण्याचा हा ज्वलंत प्रश्न आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेनेकडून श्रेयाचं राजकारण सुरू आहे. गेल्या चार दशकांपासून निळवंडे धरणाच्या कामावरूनच लोकसभा निवडणुका लढवल्या जात आहेत. शिर्डी साईबाबा संस्थानने कालव्यांच्या कामासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यावरुन श्रेयवाद सुरू आहे, तर अकोले तालुक्यात बंदीस्त कालव्यांची मागणी करत राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी कालव्यांची कामे बंद पाडली. संगमनेर तालुक्यातील काही गावे, तर राहाता तालुक्यातील काही गावातील शेतकरी पिचडांविरोधात जोरदार आंदोलन करत आहेत. निळवंडे कालव्यांच्या मुद्द्यांवरच पुन्हा एकदा ही निवडणूक केंद्रीत राहणार असल्याचं सध्या तरी दिसतंय.

2014 लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते

सदाशिव लोखंडे – शिवसेना – 532936

भाऊसाहेब वाकचौरे – काँग्रेस – 333014

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....