रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!

जालना : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे दिसते आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हेच जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असतील, हे स्वत: अर्जुन खोतकर यांनीच जाहीर केले आहे. अर्जुन खोतकरांनीच जाहीर केली स्वत:ची उमेदवारी! “लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची, अशी […]

रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

जालना : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे दिसते आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हेच जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असतील, हे स्वत: अर्जुन खोतकर यांनीच जाहीर केले आहे.

अर्जुन खोतकरांनीच जाहीर केली स्वत:ची उमेदवारी!

लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची, अशी आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव झालेला आहे. शिवसेनेने चाचपणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याच्या सूचना मला दिल्या आहेत. त्यामुळे जाहीर आहे की, मी लोकसभेची निवडणूक लढणार आहे.”, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलोय. आता जर समजा शिवसेना-भाजप युती झालीच, तरीही जालन्याची जागा भाजपऐवजी शिवसेनेने लढावं, अशी मागणी मी करणार आहे.असे अर्जुन खोतकर म्हणाले.

किंबहुना, रावसाहेब दानवेंना दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत करेन, असा विश्वासही अर्जुन खोतकरांनी व्यक्त केला आहे.

जालन्याची जागा भाजपाची होती. मात्र, आता ती परिस्थिती राहिली नाही. भाजप ही शिवसेनेच्या मदतीने सातत्याने निवडून आलेली आहे. इतक्या वर्षात ते (रावसाहेब दानवे) चार वेळा निवडून आले. शिवसेनेचे लाखों मते त्याच्या पारड्यात पडले. शिवसेनेची पूर्णपणे ताकद त्यांच्या पाठीमागे होती. येथून पुढच्या काळात शिवसेनेची ताकद त्यांच्या पाठीमागे राहणार नाही.” असा स्पष्ट इशारा खोतकरांनी दानवेंना दिला आहे.

संजय काकडे यांनी म्हटले होते की, जालन्यात शिवसेनेची ताकद आहे. त्यावर बोलताना खोतकर म्हणाले, भाजपचा सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे हे सांगतात की, जालना जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आहे. आणि का नाही ताकद, तुम्ही बघा ना शिवसेनेची ताकद. आमची पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्व संस्थावर आमचा कब्जा आहे. लोकांमध्ये जनसामान्यमध्ये शिवसेनेच्या भूमिके विषयी आदर आणि चांगली भावना आहे. शिवसेनेचा मतदार या जिल्ह्यामध्ये आहे आणि तोही लाखांमध्ये आहे.

जालन्यात निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागेल. हे अटळ सत्य आहे, असा विश्वासही खोतकरांनी व्यक्त केला.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.