Ramtek Lok sabha result 2019 : रामटेक लोकसभा मतदारसंघ निकाल
रामटेक : रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांनी बाजी मारली आहे. रामटेक मतदार संघात देशातील पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 62.12 टक्के इतकं मतदान पार पडलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झालं. 2014 च्या निवडणुकांमध्ये 62.70 टक्के मतदान झालं होतं. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाणे […]
रामटेक : रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांनी बाजी मारली आहे. रामटेक मतदार संघात देशातील पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 62.12 टक्के इतकं मतदान पार पडलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झालं. 2014 च्या निवडणुकांमध्ये 62.70 टक्के मतदान झालं होतं. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात लढत होती.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | कृपाल तुमाणे (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | किरण रोडगे-पाटनकर (VBA) | पराभूत |
रामटेक मतदार संघात यंदाची निवडणूक ही शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक शिगेला पोहोचलेली होती. यंदाच्या लोकसभेसाठी शिवसेनेकडून कृपाल तुमाणे तर काँग्रेसकडून किशोर गजभिये निवडणुकीच्या रिंगणात होते.
या लढतीला महत्त्व का?
2014 मध्ये रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणे निवडून आले होते. त्यावेळी त्यांना 5 लाख 9 हजार 892 मतं पडली होती. गेल्या निवडणुकीला काँग्रेसने मुकुल वासनिक यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, ते पराभूत झाले. त्यावेळी यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने किशोर गजभिये यांना संधी दिली.
राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक म्हणजे रामटेकची लढत होती. रामटेक हा नागपूरचा ग्रामीण भाग आहे. कधी काळी रामटेक हा काँग्रेसचा गड असलेला मतदार संघ होता. मात्र, या ठिकाणी शिवसेनेने आपली ताकत वाढवली आणि रामटेकच्या गडावर भगवा फडकवला. त्यामुळे काँग्रेसला आपला मतदार संघ परत मिळवायचा होता. दुसरीकडे शिवसेनेला आपला गड राखायचा होता. यामध्ये शिवसेना यशस्वी ठरली.
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी
मतदार संघ 2014 2019
काटोल 64.17% 64.29%
सावनेर 65.40% 62.56%
हिंगणा 59.56% 58.42%
उमरेड 63.70% 67.15%
कामठी 58.75% 58.60%
रामटेक 65.62% 64.58%
एकूण टक्केवारी पाहता 2014 च्या तुलनेत मतदानात 0.58 टक्क्यांची घट झाली.
यंदाच्या मतदानाचा विचार केला 2014 च्या तुलनेत 2019 च्या मतदानात तसा फारसा काही फरक पडलेला नाही. मात्र, महत्वाचं म्हणजे तरुण मतदार वर्ग हा या निवडणुकीचं वैशिष्ट्य होतं. यंदाच्या मतदानात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाने सहभाग घेतला. त्यामुळे या तरुण मतदारांचा कल नेमका कुणाकडे असेल, यावर बऱ्याच बाबी अवलंबून होत्या.
यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्ये, कुणा-कुणाच्या सभा झाल्या?
रामटेक मतदार संघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत असल्याने या निवडणुकीला रंगत आली होती. यंदाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रोजगार हे मुद्दे मोठ्या प्रमाणात गाजले. प्रचारात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, तर नागपुरात राहुल गांधी यांनी सभा घेतल्या. तर शिवसेनेच्या प्रचारासाठी स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन सभा घेतल्या. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही रामटेक मतदार संघात दोन सभा घेतल्या. त्याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही तुमाणे यांच्यासाठी प्रचार केला होता.
प्रचारा दरम्यान रामटेक मतदार संघात वेगवेगळे मुद्दे गाजले. राष्ट्रीय तसेच स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक लढवण्यात आली होती. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र, यंदाही शिवसेनेने रामटेकमध्ये विजय मिळवला आहे.