1 कोटीचे बिल, 20 लाख हप्ता, तीन मंत्र्यासमोर आमदाराने केली पोलखोल

सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल भाजप आमदारांनी केली. विशेष म्हणजे यावेळी तीन मंत्री उपस्थित होते. त्या आमदारांनी ठेकेदाराला फोन करून हे अधिकारी कसे हप्ते घेतात याची माहिती मंत्र्यांना दिली.

1 कोटीचे बिल, 20 लाख हप्ता, तीन मंत्र्यासमोर आमदाराने केली पोलखोल
JALGAON MINISTER
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 4:57 PM

जळगाव : 21 ऑगस्ट 2023 | राज्यात ठिकठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. महावितरणचे अधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यांने चांगली वागणूक द्रत नाहीत. भरमसाठ वीज बिल पाठवून त्यांची पिळवणूक करत आहेत. तर, दुसरीकडे महावितरणचे अधिकारी टेंडरमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार करतात याची पोलखोल भाजप आमदारांनी केली. विशेष म्हणजे राज्यसरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री यावेळी उपस्थित होते. हा प्रकार जिल्हानियोजन समितीच्या बैठकी दरम्यान जळगाव येथे घडला.

जळगाव जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राज्याचे गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि अनिल भाईदास पाटील असे तीन मंत्री उपस्थित होते. तर, भाजप आमदार मंगेश चव्हाण हे ही या बैठकीला हजर होते.

हे सुद्धा वाचा

आमदार मंगेश चव्हाण यांनी याच बैठकीत महावितरण विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. तसेच, महावितरणचे अधिकारी कशा पद्धतीने टेंडरमध्ये भ्रष्टाचार करतात याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी आढावा बैठकीत प्रश्न उपस्थित केला.

आमदार मंगेश चव्हाण यांनी तीन मंत्र्यांसमोरच एका ठेकेदाराला फोन लावला. यावेळी त्यांनी आपला फोन स्पीकर मोडवर ठेवला होता. आमदार आणि ठेकेदार यांचे ते संभाषण उपस्थित सर्व मंत्र्यांसह सर्व सदस्यांना ऐकवला.

आमदारांनी फोन केल्यावर त्या ठेकेदाराने अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी 1 कोटीच्या बिलासाठी 20 लाख रुपये हप्ते घेतल्याची आपबिती सांगितली. जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीतच आमदार मंगेश चव्हाण यांनी महावितरण विभागासह विविध विभागातील हप्ते खोरीची पोल खोल केल्यामुळे एकच चर्चा सुरु झाली.

या प्रकारानंतर मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल भाईदास पाटील या तिन्ही मंत्र्यांनी संबंधित महावितरण अधिकारी यांच्यावर संताप व्यक्त करत कारवाई करण्याचे आदेश दिले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.