
धुळे : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. महामार्गावर असलेल्या पळासनेर गावाजवळ झालेल्या या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात २८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानुसार भरधाव टँकरने आधी काही वाहनांना उडवले. त्यानंतर तो हॉटेलमध्ये घुसला. बांधकाम साहित्य घेऊन जाणारा हा भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्यानंतर एकच खळबळ उडाली.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ ३० जूनच्या मध्यरात्री भीषण अपघात झाला होता. समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा झालेल्या या अपघात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसांत दुसरा राज्यात दुसरा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कंटेनरने काही वाहनांना उडवले. मग तो हॉटेलमध्ये शिरला.
धुळे शहरात कसा झाला अपघात पाहा व्हिडिओतून pic.twitter.com/G9IwJneS3v
— jitendra (@jitendrazavar) July 4, 2023
आग्राकडून मुंबईकडे येणाऱ्या १४ चाकी कंटेनर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मंगळवारी सकाळी होता. त्यावेळी त्या टँकरचे ब्रेक फेल झाले. मग समोर येईल, त्या वाहनांना उडवत कंटनेर हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. राज्य सरकारने घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले आहे. तसेच जखमींना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.