HSC Exam 2022 : ऑनलाईन धडे घेतलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची आज पासून ऑफलाईन परीक्षा, 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार परीक्षा

रंतु आज मात्र ऑनलाईन धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रांवरती कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आज ऑनलाईन धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा देताना मोठी कसरत करावी लागेल असं वाटतंय.

HSC Exam 2022 : ऑनलाईन धडे घेतलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची आज पासून ऑफलाईन परीक्षा, 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार परीक्षा
फाईल फोटो Image Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 8:50 AM

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड (HSC Exam) परीक्षेला आजपासून सुरूवात होणार आहे. ही परिक्षा (EXAM) राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार आहेत. कोरोनाच्या (corona) काळात दोन वर्ष परीक्षा न झाल्याने गुणवत्ता दर्जा घसरत असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. परंतु आज मात्र ऑनलाईन धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रांवरती कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आज ऑनलाईन धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा देताना मोठी कसरत करावी लागेल असं वाटतंय. 9 हजार 635 केंद्रावर होणार परीक्षा होणार असून 5 आणि 7 मार्चला होणार पेपर मात्र पुढे ढकलण्यात आला असून तो पेपर 5 आणि 7 एप्रिलला होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

  1. या नियमांचे पालन करावे
  2. विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या आगोदर किमान 30 मिनिटे जावं लागेल.
  3. विद्यार्थ्यांना फेस मास्कसोबत ठेवणे अनिवार्य आहे, त्याचसोबत त्यांच्याकडे सॅनिटायझर ठेवणे गरजेचं आहे.
  4. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरती विद्यार्थ्यांची तापमान तपासणी केली जाईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवता येणार नाही.
  5. विद्यार्थ्यांच्या हातात पेपर आल्यानंतर त्यांनी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका नीट वाचून घ्यावी

पेपरसाठी वाढीव वेळ

मागच्या दोन वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा सवय लागली होती. परंतु गुणवत्ता घसरत असल्याची तक्रार आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आला आहे. परीक्षेच्या केंद्रावरती विद्यार्थ्यांनी वेळेच्या आगोदर पोहचायचं आहे. आज विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर असून त्यांना वाढीव वेळ देण्यात आला आहे. कारण दोन वर्षाच्या काळात परीक्षा ऑफलाईन झाल्याने विद्यार्थ्यांचा लिखानाचा सराव कमी असेल. 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी तब्बल पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. आज सुरू झालेली परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरू राहील.

अमरावती विभागातील १ लाख ५५ हजार विद्यार्थी देणार

अमरावती विभागातील १ लाख ५५ हजार विद्यार्थी देणार १२ वीची ऑफलाईन लेखी परीक्षा देणार आहेत. अमरावती विभागात २ हजार ५२७ केंद्रावर घेतली जाणार बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे. ८० गुणांच्या पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता साडेतीन तासांचा वेळ मिळेल. प्राथमिक, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा शिक्षण अधिका-यांसह उपजिल्हाधिकारी पथक गैरप्रकार होऊ नये काळजी घेणार आहेत.

Russia Ukraine War Live : रशियन सैन्याचा युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार

180 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल, रावसाहेब दानवेंकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; मुलांना पाहून कुटुंबीय भावनिक

समृद्धी महामार्गावर जालन्यात राजेशाही सजावट, पुलावर लक्षवेधी नक्षीकाम, ‘जालना सोने का पालना’ थीम काय ?

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...