2015 IAS Topper : ‘ हम रहे या ना रहे कल…’ IAS टीना डाबींचं Hidden Talent वायरल!

नुकताच IAS टीना डाबींचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात त्यांचं hidden talent समोर आलंय आणि ते बघून त्यांचा चाहतावर्ग देखील अवाक् झालाय. हा व्हिडीओ त्यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टग्राम हॅन्डलवर शेअर केला होता.

2015 IAS Topper : ' हम रहे या ना रहे कल...' IAS टीना डाबींचं Hidden Talent वायरल!
IAS टीना डाबींचं hidden talent वायरल!Image Credit source: Tina Dabi twitter account
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 6:32 PM

नवी दिल्ली: आयएएस टीना डाबी (IAS Tina Dabi) लवकरच IAS प्रदीप गवांडे (IAS Pradeep Gawande) यांच्यासोबत लग्न करणार आहेत. दुसऱ्या लग्नाच्या निमित्ताने टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. टीना डाबी सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहेत. नुसत्या इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोवर्स 15 लाखांच्या घरात आहेत. बऱ्याचदा त्या इंस्टाग्रामवर फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसतात. त्यांचा चाहतावर्ग देखील त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. सोशल मीडियाच्या दुनियेनं अनेकांना भुरळ घातलीये. कलाकार, खेळाडू सगळेच जण सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात मग यात IAS टीना डाबी तरी कशा मागे राहतील ? मजबूत फॅन फॉलोईंग असणाऱ्या टीना डाबी इंस्टाग्राम वर नेहमीच काहीना काही शेअर करत असतात. या निमित्ताने त्यांचा चाहतावर्ग देखील आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे यावर लक्ष ठेऊन असतात.

नुकताच IAS टीना डाबींचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात त्यांचं hidden talent समोर आलंय आणि ते बघून त्यांचा चाहतावर्ग देखील अवाक् झालाय. या व्हिडिओत टीना डाबी गाणं गाताना दिसून येतायत. हा व्हिडीओ त्यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टग्राम हॅन्डलवर शेअर केला होता. व्हिडीओ जुना असला तरी आतापर्यंत तो साडे पाच लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय आणि हाच व्हिडीओ प्रचंड प्रमाणात वायरल होतोय. ज्यामुळे टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. हजारोच्या संख्येत या व्हिडिओवर चाहत्यावर्गाने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टीना डाबींचं hidden talent

‘MusicalPerformance’ असं कॅप्शन देत टीना डाबींनी एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय ज्यात त्या चक्क गाताना दिसतायत. व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत अनेक लोक माईक पकडून उभे आहेत. टीना डाबी ग्रुप सोबत उभ्या आहेत. “हम रहे या ना रहे कल..” हे गाणं म्हणताना त्या दिसून येतायत. टीना डाबींचा हा व्हिडीओ लबसना मधील एका कार्यक्रमातील असल्याचं दिसून येतंय.

View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

‘रील्स’ची आवड असणाऱ्या IAS टीना डाबी

इतर फोटोज आणि व्हिडीओज प्रमाणे टीना डाबींना रील्स बनवायची देखील प्रचंड आवड आहे. त्या नेहमीच रील्स शेअर करत असतात ज्यात कधी त्या आपल्या आजोबांसोबत पतंग उडवताना दिसून येतात. तर कधी मित्र मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसतात. त्यांच्या रील्सला देखील लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत असतात.

View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

IAS टीना डाबींचा पहिला विवाह देखील होता चर्चेत

टीना डाबी या UPSC 2016 च्या टॉपर असून सध्या राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. मूळच्या दिल्ली येथील रहिवासी असणाऱ्या टीना डाबी यांचा IAS अतहर खान यांच्याशी 2018 साली पहिला विवाह झाला होता. हा आंतरधर्मीय विवाह बराच काळ चर्चेत होता. त्या नंतर दोनच वर्षात दोघांमध्येही मतभेद होऊन ते सहमतीने वेगळे झाले. त्यानंतर आता टीना डाबी यांनी प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधायचं ठरवलं आहे.

इतर बातम्या:

Green Hydrogen म्हणजे काय, धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या इंधनावर कार कशी धावते?

VIDEO : अमरावतीत दोन गटात तुफान राडा, हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Harsh Sanghvi: बलात्काराला मोबाईल फोन जबाबदार; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.