तुळजाभवानी देवीचे 207 किलो सोनं, 2500 किलो चांदी वितळवली जाणार

तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोने-चांदीचे दागिने आता वितळवण्यात येणार आहे. मंदीर प्रशासनाने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याबाबत समिती देखील गठीत करण्यात आली आहे. ही समिती आपल्या कामालादेखील लागली आहे. तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलेलं तब्बल 207 किलो सोनं, 2500 किलो चांदी वितळवण्यात येणार आहे.

तुळजाभवानी देवीचे 207 किलो सोनं, 2500 किलो चांदी वितळवली जाणार
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 8:53 PM

संतोष जाधव, Tv9 मराठी, धाराशिव | 24 नोव्हेंबर 2023 : तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी लाखो कोट्यवधी रुपयांचं सोने आणि चांदी अर्पण केलं आहे. आता मंदीर प्रशासन हे सोनं आणि चांदी वितळवणार आहे. विशेष म्हणजे तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोने आणि चांदी वितळवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. भक्तांनी 2009 पासून 2023 पर्यंत 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी देवीच्या चरणी अर्पण केली आहे. हे सोने-चांदी वितळवण्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती आपल्या कामालादेखील लागली आहे. ही समितीचे सदस्य सोने वितळवने नियमावली करण्यासाठी शिर्डी देवस्थानच्या भेटीला रवाना झाले आहेत.

कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोने चांदी वितळवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तुळजाभवानी चरणी भक्तांनी 2009 पासून 2023 पर्यंत 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. हे सर्व सोने आणि चांदी आता वितळवले जाणार आहे. यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शिर्डी देवस्थानच्या भेटीला रवाना झाली आहे. ही समिती शिर्डी देवस्थानच्या संस्थेला भेट देवून अभ्यास करणार आहे. त्यानंतर सोने आणि चांदी वितळवण्याबाबत नियमावली तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

14 वर्षानंतर देवीच्या तिजोरील सोने मोजण्यात आले

तब्बल 14 वर्षानंतर देवीच्या तिजोरील सोने मोजण्यात आले होते. त्यानंतर ते वितळवले जाणार आहे. सोने, चांदी, दागिने वितळवण्यास विधी आणि न्याय विभागाने मंजुरी दिल्यानंतर मंदीर संस्थानने प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही समिती नेमली आहे. समितीचे काम सुरुदेखील झालं आहे.

भक्तांची देवाप्रती आस्था असते. भक्त खूप मनोभावे देवाची पूजा आणि प्रार्थना करतात. आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भक्त देवाकडे साकडं घालतात. ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त खूप समाधानी आणि आनंदी होतात. त्या आनंदातून भक्त आपल्या देवाच्या चरणी सोनं किंवा चांदीचे दागिने अर्पण करतात. यामागे भक्तांची खूप शुद्ध भावना आणि भक्ती असते. दरवर्षी अनेक नामांकीत मंदिरांमध्ये हजारो कोटींचं सोनं-चांदी भक्तांकडून देवाच्या चरणी अर्पण केलं जातं. तुळजाभवानी आईच्या चरणीदेखील भक्त अशाचप्रकारे सोनं-चांदी अर्पण करतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.