रायगड : अवघ्या काही दिवसांवर पावसाळा (rainy season) येऊन ठेपला आहे. या वर्षी तब्बल 22 दिवस समुद्राला (Sea) उधाण येणार असल्याची आकडेवारी शासनाने (government) जाहीर केली आहे . या मध्ये 16 जून आणि 15 जुलै रोजी सर्वात मोठी म्हणजे 4 . 87 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यावेळी स्थानिकांनी आणी पर्यटकानी समुद्र किनारी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या वर्षी जून-जुलै प्रत्येकी सहावेळा तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रत्येकी पाचवेळा समुद्राला उधाण येणार आहे. या वर्षी एकूण अठरा दिवस हे उधाण रहाणार आहे. तर या दिवशी समुद्र किनारी पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे समुद्र किनारी जे लोक राहत असतील त्यांनी सुरक्षेसाठी वरील तारखांना सुरक्षित स्थळी रहावे, असं आवाहन करण्यात आलंय.
मुंबईत समुद्राला उधाण असताना प्रचंड उंच लाटा किनाऱ्यावर आदळतात. साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांपासून धोका होऊ शकतो. याचवेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले गेल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. असं उधाण धोकादायक असल्याने प्रशासनाकडून वेळोवेळी सतर्क केलं जातं. त्यामुळे प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे आणि धोका टाळावा.
या वर्षी जून-जुलै प्रत्येकी सहावेळा तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रत्येकी पाचवेळा समुद्राला उधाण येणार आहे. या वर्षी एकूण अठरा दिवस हे उधाण रहाणार आहे. तर या दिवशी समुद्र किनारी पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
16 जून आणि 15 जुलै रोजी सर्वात मोठी म्हणजे 4 . 87 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या तारखेला समुद्र किनाऱ्याजवळ न जाता सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन केलं जातंय. या काळात समुद्र किनाऱ्याजवळ राहणं धोकादायक आहे. कारण, समुद्राच्या लाटा मोठ्या असतात. लोक या काळात मुद्दामहून समुद्रकिनारी जातात. पण, प्रशासनाने केलेल्या आवाहनाचं पालक करावं, समुद्राच्या ठिकाणी 16 जून आणि 15 जुलै या काळात जाऊन नये. कारण, या तारखेदरम्यान सर्वात मोठं उधाण येणार असल्याची माहिती आहे. साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांपासून धोका होऊ शकतो. याचवेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले गेल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सुरक्षितस्थळी राहून सतर्क रहावे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. या तारखेला कुणी समुद्रकिनारी जात असल्यास त्यालाही रोखावं.
इतर बातम्या
Bhonga: आता थिएटरमध्येही वाजणार ‘भोंगा’; मनसेकडून पत्रकार परिषदेत घोषणा
‘या’ आहेत भारतातील, सर्वात सुरक्षित कार: यांना मिळाले ‘क्रॅश चाचणी’ त 5 स्टार रेटिंग !