नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 520 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले.
नाशिकच्या सराफा बाजारात रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 450 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 75 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे 67 हजार रुपये होते. सोमवारी मात्र, सोन्याचे दर वाढले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 520 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हॉलमार्किंग शुल्कचा उल्लेख आवश्यक
BIS च्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. हॉलमार्क केलेल्या मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइसमध्ये प्रत्येक वस्तूचा तपशील, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केले पाहिजे. अनेक दुकानदार ग्राहकांना कच्ची बिले किंवा तात्पुरती बिलेही देतात. तात्पुरते बिल हे असे असते जे व्यापाऱ्याने एखाद्या वस्तूच्या खरेदीवर ग्राहकाला दिलेले असते जे व्यापार्याच्या ऑडिट किंवा लेजरमध्ये दाखवले जात नाही. त्यामुळे तो कर भरणे टाळू शकतो. येथे ग्राहक विविध प्रकारचे कर (आता जीएसटी) भरण्याचेही टाळतो. तात्पुरत्या बिलामध्ये फक्त ज्वेलरी स्टोअरचे नाव (ज्यामधून दागिन्यांचा तुकडा खरेदी केला गेला आहे) आणि तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांची वस्तू दर्शवते. हे सहसा कोऱ्या कागदावर बनवले जाते. अशा व्यवहारातून काळा पैसा निर्माण होतो. त्यामुळे पक्क्या बिलात खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता, दागिन्यांचे नाव आणि कोड, तुम्ही किती सोन्यासाठी पैसे देत आहात. तसेच अतिरिक्त शुल्क जसे की मेकिंग आणि वेस्टेज चार्ज, ज्वेलर्सचा GST ओळख क्रमांक याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. (24 carat gold price at 49520 in Nashik bullion market)
इतर बातम्याः
बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली
Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’https://t.co/mThHQYOyX6#Marathwada|#HyderabadMuktisangram|#FreedomFighterAnantraoBhalerao|#Aurangabad|#Maharashtra|#Razakar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021