गोरगरीबांची विठ्ठल रखुमाई ‘जमीनदार’, पण अर्ध्या अधिक जमीनीवर डल्ला? वाचा सविस्तर

महाराष्ट्राच्या लाखो भक्तांचं प्रेरणास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या नावे राज्यभरात अडीच एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे (25 hunder acres of land on vitthala's name of Pandharpur).

गोरगरीबांची विठ्ठल रखुमाई 'जमीनदार', पण अर्ध्या अधिक जमीनीवर डल्ला? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 6:32 PM

पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्राच्या लाखो भक्तांचं प्रेरणास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या नावे राज्यभरात अडीच एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 1 हजार 21 एकर जमीन सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ताब्यात आली आहे. मंदिर समितीने कोरोना काळात यातील दोनशे एकर जमीन ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. उर्वरित जमीन मिळवण्यासाठी समितीकडून प्रयत्न सुरू आहेत (25 hunder acres of land on vitthala’s name of Pandharpur).

नाडकर्णी आयोगाच्या अहवालात विठोबाच्या नावे राज्यभरात विविध गावात जमिनी असल्याची कागदपत्रे तसेच जमीनी असल्याचे पुरावे नोंदी आहेत. अशा जमिनी ज्या जिल्ह्यात आहेत. तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला गेला. यामध्ये अडीच हजार एकर जमीन विठोबाच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे (25 hunder acres of land on vitthala’s name of Pandharpur).

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमिनी?

सातारा जिल्ह्यातील 9, सोलापूर 8, अकोल्यातील 2, तसेच उस्मानाबाद, अमरावती, नाशिक, यवतमाळ, भंडारा आणि अहमदनगर अशा विविध जिल्ह्यातील अनेक गावात जमिनी असून या ताब्यात घेण्यासाठी स्वतंत्र मालमत्ता अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत 1021 एकर जमीन ताब्यात घेण्यात मंदिर समितीला यश आले आहे. अध्याप 1400 एकर जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत मदिर समितीला मिळालेल्या जमिनीपैकी सर्वाधिक जमिनी सातारा जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल विदर्भातील भंडारा, नागपूर जिल्ह्यात आहेत.

जमिनी ताब्यात घेण्याचं काम केव्हापासून सुरु?

शासनाने कायदा करुन मंदिर ताब्यात घेतलं. यामध्ये कायदा करण्यापूर्वी तत्कालीन नाडकर्णी कमिशनने शासनास दिलेल्या अहवालात विठुरायाला अर्पण केलेल्या जमिनीचा लेखाजोखा देण्यात आला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून मंदिर समितीने जमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून गतवर्षी 900 एकर जमीन मंदिर प्रशासनाने ताब्यात घेतली. तर कोरोना संकटात लॉकडाऊनच्या दहा महिन्याच्या काळात पत्र जमा करून सुमारे दोनशे एकर जमिनीच्या कागदपत्रावर मंदिर समितीची मालकी हक्क म्हणून नाव लागले आहे.

शेतकऱ्यांना भाडेतत्वावर जमिनी

सध्या मंदिर समितीकडून जमिनी ताब्यात घेऊन या जमिनी काही शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. त्यामधून मंदिर समितीला उत्पन्न देखील मिळणार आहे. मंदिर समितीने आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या जमिनी या राज्यातील 81 विविध गावांमधील आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी काही गावात जमिनीच्या नावासाठी विठोबा, विठ्ठल, पांडुरंग, रुक्मिणी अशा वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. या नावाच्या ठिकाणी आता कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अशा नावाचा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

किती एकर जमिनी ताब्यात घेण्याच्या बाकी? ताब्यात घेण्यासाठी अडचणी नेमक्या काय?

अकोला, यवतमाळ, पंढरपूर, कोल्हापूर या ठिकाणच्या जवळपास 425 एकर जमीनचा वाद हा न्यायालयात प्रलंबित आहे. अनेक शेतकऱ्यांनी या जमिनी ताब्यात देण्यास विरोध दर्शवला आहे. कारण उताऱ्यावर विठ्ठल, पांडुरंग, रुक्मिणी अशी नावे आहेत. त्यामुळे या जमिनी आपल्या गावातील देवदेवतांचीच आहेत, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. हा वाद आता न्यायालयात गेला असल्याने निकाल लागेपर्यंत नाव लावण्यास विलंब होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या जमिनी मंदिरे समितीच्या ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. आतापर्यंत 1 हजार 21 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. उर्वरित 1400 एकर जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना काळात 200 जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र लवकरच 2500 एकर जमीन पंढरपूरच्या विठोबाच्या ताब्यात येईल. त्यामुळे गोरगरिबांच्या विठोबाच्या खजिन्यात आता शेकडो एकर जमिनीची भर पडणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यानी सांगितले.

हेही वाचा : अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं; अजित पवारांची जहरी टीका

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.