जळगावातही ‘सांगली पॅटर्न’?, भाजपचे 27 बंडखोर नगरसेवक ठाण्यात; शिवसेनेचा महापौर होणार?

जळगाव महापालिकेत सत्तासमीकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे. (27 BJP corporators migrate to Sena in Jalgaon civic body)

जळगावातही 'सांगली पॅटर्न'?, भाजपचे 27 बंडखोर नगरसेवक ठाण्यात; शिवसेनेचा महापौर होणार?
शिवसेना-भाजप
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 12:22 PM

जळगाव: जळगाव महापालिकेत सत्तासमीकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. हे 27 नगरसेवक ठाण्यात दाखल झाले असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जळगावच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे जळगावातही सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार असल्याची जोरदार चर्चा असून शिवसेनेच्या या खेळीने भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचल्याचं बोललं जात आहे. (27 BJP corporators migrate to Sena in Jalgaon civic body)

जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर भाजपचा हा बालेकिल्ला खिळखिळा होताना दिसत आहे. येत्या 18 मार्च रोजी जळगाव महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आहे. पालिकेत भाजपचं संख्याबळ कमी असूनही शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे-गुलाबराव पाटलांचे डावपेच

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी राजकीय डावपेच आखत भाजपच्या 27 नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यात यश आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बंडखोर नगरसेवक ठाण्यात

विशेष म्हणजे हे 27 नगरसेवक शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज दिल्लीत आहेत. ते रात्री उशिरा ठाण्यात येतील. त्यामुळे हे नगरसेवक शिंदे यांना रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भेटतील, असं सूत्रांनी सांगितलं. तसेच हे नगरसेवक मुंबईत गुलाबराव पाटील यांचीही भेट घेणार असून पुढील रणनीती ठरवणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.

जैन-खडसे एकत्र येणार?

दरम्यान, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत गिरीश महाजन यांना धोबीपछाड देण्यासाठी ज्येष्ठ नेते सुरेश जैन आणि एकनाथ खडसे हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत खडसे आणि जैन हे शिवसेनेला मदत करणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे महाजन या खेळीला कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निधी नसल्यामुळेच नगरसेवकांचं बंड?

पालिकेत सत्ता आल्यानंतरही जळगाव पालिकेला भाजपच्या काळात निधी मिळाला नाही. आताही वर्षभरात केंद्राचा निधी वगळता जळगाव पालिकेला निधी मिळाला नाही. त्यातच कोरोनामुळे पालिकेला आर्थिक चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बेचैन होते. भाजपच्या नगरसेवकांची हीच बेचैनी हेरून शिंदे-पाटील यांनी या नगरसेवकांभोवती जाळं फेकलं आणि त्यात हे नगरसेवक सापडल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, 18 मार्च रोजीच जळगाव पालिकेचं राजकीय चित्रं काय असेल हे स्पष्ट होणार आहे. (27 BJP corporators migrate to Sena in Jalgaon civic body)

एकूण नगरसेवक: 80

भाजप : 57 शिवसेना : 15 एमआयएम : 3 स्विकृत नगरसेवक : 5 (मतदानाचा हक्क नाही)

सांगलीत काय घडलं?

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली. मात्र ती अखेर व्यर्थ ठरली असल्याचे समोर आले आहे. (27 BJP corporators migrate to Sena in Jalgaon civic body)

संबंधित बातम्या:

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीपूर्वी वातावरण तापलं, जिल्हाध्यक्षांचा आदेश झुगारत राष्ट्रवादीच्या निवडी जाहीर

मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार; परवानगीसाठी NIA ची गृहमंत्रालयाला विचारणा?

पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या, अजितदादांची मोदी सरकारकडे मागणी

(27 BJP corporators migrate to Sena in Jalgaon civic body)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.