मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के डिव्होर्स, अमृता फडणवीस यांचा दावा

आपल्याला स्वत:ला विचार करायला पाहिजे की आपण काय बोलायला पाहिजे आणि काय नको. स्त्रियांच्यावरती अत्याचार झाल्यावर आपल्याकडे बोलायला सुरूवात होते. पण आपल्याकडे बदल घडायला हवा. " असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के डिव्होर्स, अमृता फडणवीस यांचा दावा
अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 1:06 PM

मुंबई – किर्तनकार बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांकडून पुण्यात (pune) आंदोलन करण्यात आलं असून तिथं बंडातात्या यांना भाजपचा (bjp) पुळका असल्याने त्यांनी असं बेताल वक्तव्य केलं असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांचं म्हणणं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुध्दा बंडातात्या कराडकर यांनी चुकीचं वक्तव्य केल्याचं म्हणटलं आहे. तसेच असं कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं सुध्दा चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त वसुली सरकार असून अनेक लोकांना किती समस्यांना सामोर जावं लागत आहे असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

नेमकं अमृता फडणवीस काय म्हणाल्या

बंडातात्या कराडकरांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात जे विधान केलं आहे, ते अत्यंत चुकीचं असल्याचं मत अमृता फडणवीस यांनी म्हणटलं आहे. त्याचबरोबर महिला आयोगाने त्याची दखल आहे. आत्तापर्यंत “स्त्रीयांनाी आपल्या देशात खूप त्रास सहन केला आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्यावरती टिपणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. खासकरून त्यांच्या खासगी आयुष्यावर टिपणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रात अनेकदा असं होतं की, कोणी काही बोलतं त्यावर आंदोलनं होतात हे असं होतचं राहिलं. आपल्याला स्वत:ला विचार करायला पाहिजे की आपण काय बोलायला पाहिजे आणि काय नको. स्त्रियांच्यावरती अत्याचार झाल्यावर आपल्याकडे बोलायला सुरूवात होते. पण आपल्याकडे बदल घडायला हवा. ” असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के डिव्होर्स

महाराष्ट्रात वैयक्तिक कमेंट कोणावरही व्हायला नको, दुसरं राजकारणातल्या महिलांवरती अनेक कमेंट केल्या जातात. परंतु ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्यावर कोणीही अजिबात कमेंट करू नये. महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला कोणतही काम जमतं नसल्याचं आपण पाहतोय, मेट्रोचं काम सुध्दा तसंच पडून आहे. तसेच एसटी कर्मचा-यांचा प्रश्न, मी सामान्य माणूस म्हणून बोलत आहे. जिथं गरजं आहे, तिथं राज्य सरकारने लक्ष द्यावं. भाजपा आणि आरएसएसचे लोक महिलांचा अधिक सन्मान करतात. आज मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के डिव्होर्स होतात, त्यामुळं राज्य सरकारने त्याच्या चुकांकडे अधिक लक्ष घालावं असं मी सल्ला देते.

औरंगाबादेत राडा! माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की!

VIDEO: अजितदादानं गुण लावला दारू विकण्याचा, बंडातात्या कराडकरांच्या टार्गेटवर नेत्यांचे पोरंबाळही

Bandatatya Karadkar: कुणाबद्दल आकस नाही, द्वेष नाही, अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.