एकाचवेळी 319 विद्यार्थ्यांनी केली सामुहीक कॉपी; UP, बिहार नाही तर महाराष्ट्रात घडलाय हा प्रकार
सोलापुरातील मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयात सामुहीक कॉपीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 319 विद्यार्थ्यांवर सामुहीक कॉपी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर : कुठे खिडकीतून कॉपी देतात, तर कुठे शिक्षकच कॉपी(Copy) करतात तर कधी कधा बेंचवर पुस्तक उघडून खुलेआम कॉपी केली जाते. कॉपी; UP, बिहार मध्ये सर्सासपणे कॉपी केली जाते. मात्र, असाच एक कॉपीचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. सोलापुरमध्ये(Solapur) एकाचवेळी 319 विद्यार्थ्यांनी केली सामुहीक कॉपी केली आहे.
सोलापुरातील मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयात(Maulana Azad Polytechnic College) सामुहीक कॉपीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 319 विद्यार्थ्यांवर सामुहीक कॉपी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई स्थित महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ही कारवाई केली आहे. सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी सिव्हिल शाखेच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ही कॉपी केलेय.
319 विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. तसेच त्यांना डिबार करत त्यांची परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचे आदेश महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले आहेत.
आम्ही परिक्षेत कोण्यात्यातही प्रकारची कॉपी केली नसल्याचा दावा केला आहे. या कॉपी प्रकरणात आता प्रहार जनशक्ती संघटनेने देखील उडी घेतली आहे. या सर्व विद्यार्थ्यासोबत सोलापूरहून मुंबईला जाऊन तंत्रशिक्षण मंडळाच्या कार्यालयात घुसणार आहोत.
तरीही विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेतली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन किंवा वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.