40 लोकांना हलवून टाकलं, आणखी काही बदल होतोय, आदित्य ठाकरे यांचा नेमका संकेत काय?

स्वच्छ विरुद्ध गलिच्छ असा संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी दौरा केला. उद्धव साहेब महाराष्ट्राला पुढे घेऊन जात होते. पण, आता कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र असे विचारावे लागतंय. आता जे काही फोटो लागतात त्यांच्या मागे कुणाचे आशीर्वाद आहे हेच कळत नाही. जनतेला राजकारणाची किळस यायला लागली आहे

40 लोकांना हलवून टाकलं, आणखी काही बदल होतोय, आदित्य ठाकरे यांचा नेमका संकेत काय?
CM EKNATH SHINDE AND ADITYA THACKERAY Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 5:17 PM

नाशिक : राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बालेकिल्ल्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. नाशिकच्या सातपूर भागात आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांनतर त्यांनी भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत सभा घेतली. भुजबळ यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर शरद पवार यांनी येवला येथे येऊन भुजबळ यांना आव्हान दिलं होत. तर, आता आदित्य ठाकरे यांनीही सभा घेत सरकारवर सडकून टीका केलीय.

आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली होती ते पाहून त्यांनी थोडा उत्साह विजय मेळाव्यासाठी ठेवा असे आवाहन केले. खोके सरकार हे फक्त घोषणांचे सरकार आहे. कुणी घोषणा दिल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटते. त्यांच्याकडे फक्त खुर्च्यांची गर्दी असते आणि इथे कार्यकर्त्यांची असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

40 लोकांना हलवून टाकलं…

या हॉटेलचे नाव काय आहे? डेमोक्रॅसी? ती देशात राहिलीय का? आम्ही भोळे आहोत. कदाचित आम्हाला राजकारण कळत नसेल. हा गुण असेल की अवगुण. आम्हाला फोडाफोडीचे राजकारण जमत नाही. आम्ही जनतेचे काम केले पण राजकारण केले नाही. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे. गद्दार आहे. अलीबाबा आणि चाळीस चोर आहे. त्या चाळीस चोरांनी महाराष्ट्राला लुटण्याचे काम सुरू केले आहे. परंतु आम्ही त्या 40 लोकांना हलवून टाकलं असे त्यांनी सांगितले.

काही बदल होतोय का?

आमच्या गटात या आम्ही पैसे देतो अशी काही जणांना ते संधी देतात. तो पैसा आम्हाला नको. आपले सरकार कुठे बसले आहे तेच कळत नाही. त्या सर्वांविरोधात एकत्र येऊन आपल्याला लढा द्यायचा आहे. तुझं तिकीट, माझं तिकीट हे बाजूला ठेऊन महाराष्ट्राला जो धोका निर्माण झाला आहे त्याला दूर करायचे आहे. मुख्यमंत्री दोन चार दिवस झाले की दिल्लीला जातात. काही बदल होतोय का ते पहातात अशी खरमरीत टीका आदित्य यांनी केली.

कोण कुठे चालला आहे हेच सुरू…

नोकऱ्यांच्या संधी होत्या त्याही दुसऱ्या राज्यात गेल्या. वेदांत फॉक्सकान गुजरातला गेला. निवडणूक डोळ्यासमोर असताना गेला. पण तिथेही फॉक्सकाँन रद्द झाला. तो प्रकल्प तिथे होऊच शकत नाही असे मी सांगत होतो. आपल्या भूमिपुत्रांना नोकरीची संधी मिळाली असती. मात्र, महाराष्ट्र द्वेष होता म्हणून प्रकल्प गेला. आमच्या मुंबईत भावी मुख्यमंत्री म्हणून नवीन होर्डिंग लागले आहेत. महाराष्ट्रात कुणीही खुश नाही. कृषी आणि उद्योगमुळे महाराष्ट्राची ओळख होती त्यात आपण मागे गेलो. राज्यात कोण कुठे चालला आहे हेच सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.