Nashik| जिल्ह्यात 480 कोरोना रुग्ण; निफाडमध्ये 90 आणि सिन्नरमध्ये 85 जणांवर उपचार सुरू
नाशिक जिल्ह्यात सध्या एकूण 480 कोरोना (Corona) रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात नाशिक महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रातील 175 रुग्णांचा समावेश आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या एकूण 480 कोरोना (Corona) रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात नाशिक महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रातील 175 रुग्णांचा समावेश आहे. निफाडमध्ये 90 आणि सिन्नरमध्ये 85 रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती गुरुवारी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 917 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये सहाने घट झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
येथे आहेत रुग्ण
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 32, बागलाण 3, चांदवड 20, देवळा 5, दिंडोरी 16, इगतपुरी 8, कळवण 2, मालेगाव 1, नांदगाव 1, निफाड 90, सिन्नर 85, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 2, येवला 17 अशा एकूण 284 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 175, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 6 तर जिल्ह्याबाहेरील 15 रुग्ण असून, अशा एकूण 480 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 107 रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.13 टक्के, नाशिक शहरात 98.20 टक्के, मालेगावमध्ये 97.17 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.77 इतके आहे. नाशिक ग्रामीण 4 हजार 220, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 6, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कॉलेज केले सील
कर्नाटकातील धारवाडमध्ये (Karnataka, Dharwad) एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (SDM college of Medical Sciences) आज 66 हून अधिक विद्यार्था कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने कॉलेज आणि वसतिगृह सील केले गेले. या सर्व 66 विद्यार्थ्यांचे करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एसडीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे तेव्हा लक्षात आले जेव्हा प्रोटोकॉल म्हणून कॉलेज कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली गेली. एकूण 400 विद्यार्थ्यांपैकी, 300 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली गेली होती.
मास्क वापरा, संसर्ग टाळा
कोरोनाची लस घेऊनही अनेकांना पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा. एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये. सुरक्षित अंतर पाळावे. कोरोनाचे इतर नियमांचे पालन करावे. त्यामुळे संसर्ग टळेल, असे आवाहन महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्याः
अखेर साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; उद्घाटनाला मुख्यमंत्री ठाकरे अन् समारोपाला शरद पवार!