नागपुरच्या रामदासपेठत भरदिवसा एटीएम फोडून 5 लाख लंपास; तोडफोड न करतो दरोडा; पोलिसांचा शोध सुरू
ही घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. नागपूरमधील वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूर: नागपूर शहरातील रामदासपेठ (Ramdas Peth) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे, त्याच ठिकाणी बँकेचे एटीएम सेंटरही आहे. आज भरदिवसा हे एटीएममधून मशीनची तोडफोड न करता 5 लाख 82 हजारची रक्कम चोरट्यांनी लंपास (Theft) केली. हा परिसर वर्दळीचा आहे, नेहमी या ठिकाणी वर्दळ असते मात्र आज याच परिसरातील एसबीआयची एटीएम (SBI Bank ATM) मशीन न फोडता त्यातील रक्कम लांबविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असले तरी भरदिवसा बँकेचे एटीएम फोडण्यात आल्याने नागपूर शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असून लवकरच या चोरीचा तपास लावला जाईल.
भरदिवसा एटीएम फोडले
एसबीआय बँकेचे एटीएमची तोडफोड न करता साडेपाच लाखापेक्षा जास्त रक्कम लांबवण्यात आल्याने आणि एटीएमची कोणतीही तोडफोड न करता त्यातून एवढी मोठी रक्कम कशी काढण्यात आली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणार असून त्याद्वारे आता तपास करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
तपासाची चक्रे वेगाने
नागपूर शहरातील रामदास पेठ हे ठिाकाण नेहमीच वर्दळीचे राहिले आह, त्यामुळे भरदिवसा या ठिकाणी चोरी झाल्याने अजब व्यक्त केले जात आहे. एसबीआय बँकेचे एटीएम न फोडता त्यातील सर्वच रक्कम चोरट्यांनी लांबविल्याने तपासाची चक्रे आता वेगाने फिरवण्यात आली आहेत. या चोरीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी शोध पथकं नेमून चोरट्यांचा शोध चालू केला आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांनी त्याकडे लक्ष देऊन गुन्हेगारीचे प्रमाण कमी करावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.