एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे

ED notice to NCP leader Eknath Khadse : खडसेंना जर ED ने नोटीस पाठवली असेल तर नेमकी कोणत्या प्रकरणात असू शकते, त्याची ही 5 कारणे

एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 11:47 AM

मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (5 reasons behind ED notice to NCP leader Eknath Khadse) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवल्याचं (ED Notice) वृत्त आहे. ईयर एण्ड अर्थात वर्षाअखेरिला म्हणजे 30 डिसेंबरला खडसेंना (ED notice to Eknath Khadse) चौकशीसाठी बोलावणं धाडल्याची माहिती आहे. खडसे भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादीत (NCP) येणं आणि अवघ्या काहीच दिवसात ईडीची नोटीस आल्याचं वृत्त येणं यामध्ये राजकारणच आहे, असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. तर भाजप नेते याप्रकरणात सावध पावलं टाकताना दिसत आहेत. ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. जर त्यांनी ED लावली तर मी CD लावेन असा इशारा एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. (5 reasons behind ED notice to NCP leader Eknath Khadse)

वाचा :  मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून चौकशीची नोटीस

या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’ने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एकनाथ खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. ही नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले. एकनाथ खडसे यांना ED ने नोटीस पाठवलीय का? जर नोटीस पाठवली असेल तर खडसेंना अद्याप मिळाली कशी नाही? ED ने नेमकी कोणत्या प्रकरणात ही नोटीस पाठवली असावी? अशा विविध प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत. खडसेंना जर ED ने नोटीस पाठवली असेल तर नेमकी कोणत्या प्रकरणात असू शकते, त्याची ही 5 कारणे-

1) राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नोटीस येऊ शकते का?

भाजप किंवा मोदी-शाहा, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जो कोणी बोलेल, त्यांच्या मागे ईडी, CBI, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा लावल्या जातात हा महाविकास आघाडीतील नेत्यांचा आरोप आहे. एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपवर विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफानी हल्ला चढवला होता. याच रागातून भाजपने सत्तेचा गैरवापर करुन आपल्या विरोधकांना ED ची नोटीस पाठवते असा आरोप आहे.

आतापर्यंत कुणाकुणाला ED नोटीस?

या आरोपांना बळ देणाऱ्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यापूर्वी विधानसभा निवडणुकीदरम्यान, खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ED ची नोटीस आली होती. नुकतंच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीची नोटीस आली आहे. कोहीनूर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कर्नाटकातील काँग्रेसचा बडा चेहरा डी के शिवकुमार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ या बड्या चेहऱ्यांना ED नोटीस आली आहे.

2) जळगावातील बीएचआर घोटाळा

एकनाथ खडसे यांनी जळगावातील कथित BHR घोटाळा बाहेर काढल्याचा दावा केला आहे. हा घोटाळा तब्बल 1100 कोटी रुपयांचा असल्याचा एकनाथ खडसे यांचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे या घोटाळ्यात त्यांनी माजी मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवलं आहे. बी एच आर पतसंस्थेमध्ये भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरही (Girish Mahajan) कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कथित घोटाळ्यातील चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावरुनच खडसेंना ED ची नोटीस आल्याचा दावा करण्यात येत आहे.

3) नवं सूडचक्र – शेखर पाटील यांचं विश्लेषण

जळगावात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल लोढा (Prafull Lodha) यांनी आजपर्यंत गिरीश महाजन यांच्यावर हल्ला चढवला होता. मात्र त्यांनी अचानक यूटर्न घेऊन, एकनाथ खडसेंवर टीकास्त्र सुरु केलं. त्यानंतर काही तासांनीच ED ची नोटीस आल्याचं कळणं हा योगायोग नक्कीच नाही. ज्यावेळी खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी खुलंच आव्हान दिलं होतं. अद्याप कारण समोर आलं नसलं, तरी ईडी नोटीस येऊ शकते हा अंदाज तेव्हापासूनच होता, म्हणजेच यामध्ये राजकारणाचा गंध आहे. हे जर सत्य असेल, तर हे नव्या पद्धतीचे सूडचक्र असल्याचं दिसतंय, असं राजकीय विश्लेषक शेखर पाटील यांनी म्हटलं.

4) अमोल मिटकरींचा दावा

“खडसेंना नोटीस हे होणारच होतं. भाजपविरोधात जो कोणी मोहिम उघडले, त्यांना केंद्रातून नोटीस पाठवण्यात येईल. प्रताप सरनाईकांनी कंगना रानौत आणि अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात आवाज उठवला, हक्कभंग सादर केला. त्यावेळी ईडीने त्यांना नोटीस पाठवली. यापूर्वी शरद पवारांनाही नोटीस पाठवण्यात आली. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळत आहेत, त्याचाच परिणाम म्हणजे ईडीची नोटीस आहे”, असा दावा राष्ट्रवादचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला.

5) खडसेंचा फडणवीसांवर हल्ला

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना एकमेव देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. भाजपमध्ये मला एकाच व्यक्तीने छळले, मला पक्ष सोडण्यासाठी मजबूर केलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी, असं खडसेंनी जाहीर विधान केलं होतं. खडसेंच्या रडारवर फडणवीसच होते. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या याच टीकेमुळे त्यांना नोटीस आलीय, असा दावा खडसेंचे समर्थक करत आहेत.

त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजप सोडत असल्याचे ते म्हणाले होते. माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता.

काय आहे बीएचआर प्रकरण?

बीएचआर सहकारी बँकेतील घोळ उघडकीस आल्यानंतर २०१७ साली खडसे यांनी त्याविरोधात तक्रार केली होती. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या प्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्याचे सुचविले. यानुसार रक्षा खडसे यांच्यासह राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यावेळी राधामोहन सिंग यांनी सांगितल्यानंतर संबंधित खात्याकडेही तक्रार करण्यात आली. मात्र, यापुढे चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप, खडसेंनी केला होता. त्यानंतर खडसे यांनी आता पुन्हा या प्रकरणाला हात घातला असून अ‍ॅड. किर्ती पाटील यांच्या माध्यमातून याप्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. (big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)

बीएचआर प्रकरणात अकराशे कोटी रूपयांच्या मालमत्ता मातीमोल भावात घेतल्याचे दिसून येत आहे. यात डिपॉजिटच्या रिसीट या ३०-४० टक्के दलालांच्या माध्यमातून घेण्यात येत होत्या. यात अनेक मोठ्या मंडळींनी मालमत्ता घेतल्याची माहिती असून याबाबतचे विवरण हे पोलीस तपासातून समोर येणार आहे, असा दावा खडसेंनी केला होता. हे प्रकरण खूप मोठे असून जवळपास दोन ट्रक इतकी सामग्री जप्त करण्यात आली असून यातून दोषींची अचूक माहिती मिळण्यासाठी तपास हा वेगाने केला तरी जवळपास एक-दोन महिने लागू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय. (big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)

(5 reasons behind ED notice to NCP leader Eknath Khadse)

संबंधित बातम्या   

मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून चौकशीची नोटीस  

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता   

बीएचआर बँक घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे, यादी तयार, दोन दिवसांत गुन्हा दाखल होणार; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.