VIDEO | 55 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला, 6 ते 7 किलोमीटर नेलं फरफटत, चिंचले खैर भागात बिबट्याची दहशत

नाशिकच्या इगतपुरीपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर चिंचले खैरे भाग आहे. या भागातील गावठा परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. 12 मार्चला रात्रीच्या सुमारास शेतातील झापावर झोपलेल्या 55 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून जंगलात फरफटत नेले. त्याचदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

VIDEO | 55 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला, 6 ते 7 किलोमीटर नेलं फरफटत, चिंचले खैर भागात बिबट्याची दहशत
55 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 1:44 PM

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरीपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर चिंचले खैरे भाग आहे. या भागातील गावठा परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. 12 मार्चला रात्रीच्या सुमारास शेतातील झापावर झोपलेल्या 55 वर्षीय महिलेवर (Women) बिबट्याने (leopard) हल्ला करून जंगलात फरफटत नेले. त्याचदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.  या दरम्यान, रात्री बिबट्या पुन्हा त्या झापावर भक्ष्याच्या शोधात आला असता ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये (CCTV) कैद झाला आहे. हा परिसर वन विभागात असल्याने बिबट्याचा वावर हा स्थानिकांसाठी धोकादायक ठरत आहे. स्थानिकांनी बिबट्यासंदर्भात काय दक्षता घ्यावी, याची माहिती वनविभाग जनजागृती करुन देत आहे. मात्र, वाढता प्राण्यांचा वावर पाहता स्थानिकांना याठिकाणी धोका निर्माण झाला आहे. आता यातून वनविभाग कसा मार्ग काढणार ते येत्या काळातच कळेल.

परिसरात भीतीचं वातावरण

चिंचले खैरे भागातील गावठा परिसरामध्ये महिलेला बिबट्याने फरफटत नेल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ चिंतेत आले आहेत. शिकारीसाठी त्याने गावातील व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर हल्ला करण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं ग्रामस्थ सांगतायेत.  तर याच परिसरातील काही आदिवासी पाड्यात मोजकीच घरे असल्याने त्यांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्याचा वावर असल्याने लहान मुलांना घराबाहेरही सोडता येत नसल्याचे पालकांनी सांगितले. बिबट्या कधी पकडला जातोय याकडे लक्ष लागले आहे.

वन विभाग सतर्क

चिंचले खैरे भागातील गावठा परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यानं वन विभागाने त्या ठिकाणी  ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे बिबट्या किंवा कोणते वन्य प्राणी येतात, हे सीसीटीव्हीत कैद होतायेत. मात्र, या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केले जात आहे. कारण, ग्रामीण भाग असल्यानं लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक घरी असतात. घरातील इतर लोक शेतात जातात. यामुळे मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. आता वन विभाग बिबट्याला कधी  जोरबंद करतो, ते पाहणं महत्वाचं ठरेलं. दरम्यान, ग्रामस्थांनी देखील खबरदारी घेत मुलांना घराबाहेर एकटे सोडायला नको. बिबट्याचा बंदोबस्त होऊस्तर तरी काळजी घेणं गरजेचं आहे.

इतर बातम्या

IDBI बँकेच्या ‘या’ योजनेत मिळवा दुहेरी फायदा, चांगल्या परताव्यासोबतच टॅक्सची बचत

Elon Musk यांचा पुण्यातला Twitter friend, पुतीन यांना आव्हान दिल्याबद्दलही आहे मस्क यांच्या पाठीशी

ढोल, बासरी, शिट्यांचा सुमधुर आवाज, सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होलिकोत्सव साजरा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.