कोरोनाची किरकिर कधी थांबणार; सिन्नरमध्ये 139 तर निफाडमध्ये 122 रुग्ण

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर आणि निफाडमध्ये अजूनही कोरोना रुग्णवाढ सुरू आहे. गुरुवारी सिन्नरमध्ये 139 तर निफाडमध्ये 122 रुग्णांवर उपचार सुरू होते.

कोरोनाची किरकिर कधी थांबणार; सिन्नरमध्ये 139 तर निफाडमध्ये 122 रुग्ण
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 1:13 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर आणि निफाडमध्ये अजूनही कोरोना रुग्णवाढ सुरू आहे. गुरुवारी सिन्नरमध्ये 139 तर निफाडमध्ये 122 रुग्णांवर उपचार सुरू होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 785 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 778 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 661 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 49, बागलाण 8, चांदवड 26, देवळा 6, दिंडोरी 30, इगतपुरी 5, कळवण 19, मालेगाव 5, नांदगाव 12, निफाड 122, पेठ 1, सिन्नर 139, त्र्यंबकेश्वर 10, येवला 65 असे एकूण 497 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 244, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 27 रुग्ण असून असे एकूण 779 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 224 रुग्ण आढळून आले आहेत.

कुटुंबाचे लसीकरण केल्यास करात सूट

कोरोना प्रतिबंधक लस जर घेतली नाही तर गावात फिरु देणार नाही, असा डॅशिंग निर्णय निफाड तालुक्यातील कसबे सुकाणे या ग्रामपंचायतीने घेतला आहे. निफाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्या कारणाने लसीकरण गरजेचे आहे. याकरता कसबे सुकेणे या ग्रामपंचायतीने डॅशिंग निर्णय घेतलाय. कसबे सुकेणे या ग्रामपंचायतीने डॅशिंग निर्णय घेताना स्पष्टीकरण दिलंय, गावातील जे ग्रामस्थ लस घेणार नाही, त्यांना गावात फिरु दिले जाणार नाही तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकाचे सुद्धा लसीकरण अनिवार्य असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितलं आहे.

डेंग्यूने केले हैराण नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही. जानेवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान डेंग्यूचे एकूण 2295 नमुने घेण्यात आले. त्यात 888 रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात चिकुन गुन्याचे 2295 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 633 रुग्ण आढळले आहेत. आता परतीच्या पावसाने थैमान घातल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यात या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या आठवड्यात महापालिकेने 258 रुग्णांचे नमुने तपासले. त्यातही 55 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे समोर येत आहे. महापालिकेने चिकुन गुन्याचे 94 नमुने तपासले आहेत. त्यात 23 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचेही रुग्ण वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालये हे डेंग्यू तसेच चिकुन गुन्याच्या रुग्णांनी भरली आहेत. बऱ्याच रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे.

इतर बातम्याः

बाळाला जबड्यात धरून नेणाऱ्या बिबट्यावर आईची चित्त्यासारखी झडप; नाशिकमध्ये हिरकणीचा थरार!

साहित्य संमेलनाची मैफल नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार; तारखांचा मेळ जुळता जुळेना!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.