धोक्याची घंटा, तर नाईट कर्फ्यू लावा, ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटावर केंद्राच्या महाराष्ट्राला 8 महत्वाच्या सुचना!

कोरोनानंतर आता देशामध्ये ओमिक्रॉनने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिली आहे.

धोक्याची घंटा, तर नाईट कर्फ्यू लावा, ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटावर केंद्राच्या महाराष्ट्राला 8 महत्वाच्या सुचना!
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 11:55 AM

मुंबई : कोरोनानंतर आता देशामध्ये ओमिक्रॉनने (Omicron) पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Union Ministry of Health) यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे आणि महत्वाची माहीती देखील सांगितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन डेल्टापेक्षा तीनपट जास्त संसर्गजन्य आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची माहीती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना चाचण्या वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. भारतात आतापर्यंत जवळपास 216 ओमिक्रॉनचे रूग्ण सापडले आहेत. मंगळवारी महाराष्ट्र, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉनच्या सर्वाधिक केस आहेत.

केंद्राने दिलेल्या महत्वाच्या सूचना! 

1. आरोग्य सचिव म्हणाले की, स्थानिक आणि जिल्हास्तरावर त्वरित निर्णय आणि कठोर कारवाईची गरज आहे. हे केल्याने ओमिक्रॉनचा संसर्ग कमी होऊ शकतो.

2. पुढे बोलताना आरोग्य सचिव म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेथे टेस्टिंग वाढवणे खूप आवश्यक आहे.

3. ज्या जिल्हांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. तिथे रुग्णालयांमध्ये कोविड-19 शी संबंधित सर्व उपलब्ध सुविधांची खात्री करण्यात यावी.

4. कठोर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा आणि गरजेनुसार स्थानिक पातळीवर रात्री कर्फ्यू सारखे निर्बंध देखील लावा. याशिवाय मोठ्या मेळाव्यावर बंदी आणा आणि लग्नासारख्या समारंभात लोकांची संख्या कमी करा.

5. सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि अधिसूचित आयसोलेशन झोन यांचाही लवकरात-लवकर आढावा घ्या.

6. सर्व पॉझिटिव्ह लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अनिवार्य आहेच.

7. डेल्टा केस अजूनही देशाच्या विविध भागांमध्ये आहेत. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा जबाबदार असल्याचे मानले जात होते.

8. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व राज्यांना लसीकरण वाढवून 100% लसीकरण कव्हरेजचे लक्ष्य पूर्ण करण्यास सांगितले आहे.

संबंधित बातम्या : 

Sanjay Raut on UP election| उत्तर प्रदेशातून गंगा उलटी वाहणार…शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करली तसेच मिश्रांबाबत होणार, राऊतांचा घणाघात…

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पालिका, पोलीसांची करडी नजर, नवे नियम जाहीर, 6 फुटांचे अंतर बंधनकारक

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.