Nashik: 80 ठिकाणांची नावे बदलणार; नेमकं काय प्रकरण, घ्या जाणून!
नाशिक जिल्ह्यातील 26 गावांची नावे सप्टेंबर महिन्यात बदलण्यात आली आहेत. यात चांदवड तालुक्यातील 9, त्र्यंबकमधील 2, निफाड 4, दिंडोरी 4, सटाणा ४, पेठ तालुक्यातील 3 गावांची नावे बदलण्यात आली आहेत.
नाशिकः नाशिकमध्ये तब्बल एक-दोन नव्हे, तर चक्क 80 ठिकाणांची नावे बदलण्यात येणार आहेत. त्यात वस्त्या, रस्ते, चौक आदींचा समावेश आहे. या भागांना नवीन नावे दिली जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. राज्याच्या समाजकल्याण विभागाने काढलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही जिल्ह्यातील अनेक गावांची आणि भागांची अशीच नावे बदलण्यात आली आहेत.
का बदलत आहेत नावे?
राज्याच्या समाजकल्याण विभागाने या भागांची नावे बदलावीत, असे आदेश काढले आहेत. कारण नाशिक शहरातील अनेक वस्त्या, वाडे, चौक, यांना दिलेली नावे ही जातिवाचक आहेत. त्यांच्या उच्चारावरून बऱ्याचदा जोरदार भांडणांचा कलगीतुरा रंगतो, तर कुठे दंगलीही पेटतात. हेच ध्यानात घेऊन राज्य सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात जातिवाचक गावांची आणि वस्त्यांची नावे बदलण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही नावे बदलण्यात येणार आहेत.
26 गावांची नावे बदलली
नाशिक जिल्ह्यातील 26 गावांची नावे सप्टेंबर महिन्यात बदलण्यात आली आहेत. यात चांदवड तालुक्यातील 9, त्र्यंबकमधील 2, निफाड 4, दिंडोरी 4, सटाणा ४, पेठ तालुक्यातील 3 गावांची नावे बदलण्यात आली आहेत. गावाचे नाव बदलण्यासाठी एक प्रक्रिया ठरवण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत नाव बदलण्याचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जातो. जिल्हाधिकारी तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवतात. राज्य सरकारने मंजुरी दिल्यास गावाचे नाव बदलण्यात येते.
येथील नावे बदलणार
नाशिक शहरामध्ये एकूण 192 झोपडपट्ट्या आहेत. यातल्या अनेकांची नावे अजूनही जातीनुसार आहेत. अनेक चौक, रस्ते, भाग, गल्ली यांना जातीनुसार नावे आहेत. सरकारच्या आदेशानुसार अशी 80 ठिकाणांची नावे बदलण्यात येणार आहेत. त्यात शहरातील कोळी वाडा, कुंभार गल्ली, तेली गल्ली, मांतग वाडा, पिंजार घाट, सुतार गल्ली, तांबट लेन ही गावे जातीवाचक असल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. आता या सर्वच भागांना नवीन नाव दिली जाणार आहेत.
राज्याच्या समाजकल्याण विभागाने जातिवाचक नावे बदलावीत असे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक शहरातील 80 ठिकाणांची जातिवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. त्यांना दुसरी नावे दिली जातील.
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
VIDEO : Pune | CNG Price Hike : पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किलोमागे मोजावे लागणार इतके रूपये – tv9#cng #CNGprice #Hike #Pune pic.twitter.com/cRg4CZkkRJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
इतर बातम्याः
Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती
Controversial Health Exam: तक्रारींच्या निराकरणानंतरच नियुक्त्या; आरोग्य मंत्र्यांचे आदेश
Malegaon Violence: रझा अकादमीवरील छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती, 52 जणांना बेड्या!