Free Uniform : मोफत गणवेश! या जिल्ह्यातील 81,000 विद्यार्थ्यांना राज्य सरकारचे गिफ्ट
Free Uniform : नवीन शैक्षणिक वर्षाच्या लगबगीत या जिल्ह्यातील 81,000 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे. प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप होणार आहे. राज्य शासनाने हे गिफ्ट देण्याचे ठरवले आहे.
मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष उद्यापासून 15 जूनपासून सुरु होत आहे. खासगी शाळांची घंटा तर दोन दिवसांपूर्वीच वाजली आहे. तर राज्यातील सरकारी शाळांमध्ये पण किलबिलाट ऐकू येणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. विद्यार्थ्यांचे जंगी स्वागतापासून तर त्यांना मोफत पाठ्यपुस्तकचं (Free Educational Books) नाहीतर मोफत गणवेशाचे (Free Uniform) पण वाटप करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या लगबगीत या जिल्ह्यातील 81,000 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे. प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप होणार आहे. राज्य शासनाने हे गिफ्ट देण्याचे ठरवले आहे.
या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सोय राज्यातील रायगड जिल्ह्यात मोफत गणवेशाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आणि अनुदान प्राप्त 81,000 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची सोय होणार आहे. राज्य सरकारच्या या गिफ्टमुळे शाळा गळतीचे प्रमाण रोखण्यात मदत होण्याची दाट शक्यता आहे. या मोफत गणवेशासाठी राज्य सरकार 2.43 कोटी रुपये खर्च करणार आहे.
जालीम उपाय रायगड जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी नसावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या 1 लाख 89 हजार 995 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायतीचा नोटीस बोर्ड आणि शाळेच्या फलकावर लावण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यात मदत होईल.
या वयोगटावर लक्ष राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने 6 ते 14 वयोगटावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या वयोगटातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. गावातील प्रतिष्ठित नागरीक, युवक, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे.
यांना मिळणार मोफत गणवेश 81,000 विद्यार्थ्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या 52,403 मुली, 15,912 मुलांचा समावेश आहे. या सर्वांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. 3,669 अनुसूचित जाती, तर दारिद्रयरेषेखालील 9,022 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने याविषयीची सूचना प्रसिद्ध केली आहे. गणवेशाचा रंग कोणता असेल याविषयीची माहिती अद्याप समोर आली नाही.
विद्यार्थ्यांना असा फायदा
- 81,000 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश
- 1 लाख 89 हजार 995 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
- पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा
- गळती रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपक्रम