Maharashtra Cabinet Expansion : भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, राजभवनात उद्या 18 मंत्र्यांचा शपथविधी

आता उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढण्यात आला. या विस्तारात 9 शिंदे गटाचे, तर 9 भाजपचे आमदार मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे.

Maharashtra Cabinet Expansion : भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, राजभवनात उद्या 18 मंत्र्यांचा शपथविधी
भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:25 PM

मुंबई : भाजपा आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. 18 जणांच्या नावांची यादीही तयार असल्याची माहिती आहे. भाजपाच्या मंत्रिमंडळात काही नव्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या 9 जणांपैकी भाजपाची पाच नावे निश्चित झाली आहेत. तर शिंदे गटातील पाच जणांनाही फोन गेल्याची माहिती आहे. भाजपाकडून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं चर्चेत आहेत. तर शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील मंत्री होणार

एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याची टीका विरोधक करत होते. आता उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढण्यात आला. या विस्तारात 9 शिंदे गटाचे, तर 9 भाजपचे आमदार मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जुन्या व नव्यांचा समावेश करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद दिल्यास आशिष शेलार यांच्याकडं भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे दिली जाऊ शकतात. चंद्रकांत पाटील यांचं नाव मंत्रीपदासाठी बहुतेक निश्चित झालं आहे. त्यामुळं शेलारांकडं भाजप प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकते.

शिंदे गटाची उद्या सकाळी बैठक

मुंबई महापालिकेकडं भाजपचं लक्ष्य आहे. मुंबई महापालिकेवर झेंडा फडकविण्याचा प्रयत्न भाजप नेते करणार आहेत. मुंबई मनपाच्या निवडणुकीवर डोळा ठेवून शेलारांकडं भाजपचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं. मंत्रिमंडळ विस्तारातही मुंबई, पुणे, नागपूर तसेच मनपा निवडणुका होणाऱ्या शहरांकडं विशेष लक्ष पुरविलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडं, शिंदे गटाची उद्या सकाळी 9 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं काही जण नाराज होण्याची शक्यता आहे. अशावेळी त्यांना विश्वासात घेतलं जाण्यासाठी ही बैठक बोलवली असल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.