94 वर्षीय ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांनी अखेर उपोषण सोडले, तीन दिवसांनी घेतला निर्णय

महाराष्ट्रातील निवडणूक निकालात सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप करीत ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांनी पुण्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिनी आत्मक्लेश आंदोलन सुरु केले होते. आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता. राज्यातील विविध नेत्यांनी बाबा आढाव यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आढाव यांनी अखेर आत्मक्लेश आंदोलन मागे घेतले.

94 वर्षीय ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांनी अखेर उपोषण सोडले, तीन दिवसांनी घेतला निर्णय
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 5:17 PM

राज्यात विधानसभा निवडणूकीत पैशांचा खेळ झाल्याचा आरोप करणाऱ्या 94 वर्षीय ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांनी अखेर तिसऱ्या दिवशी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यातिथीच्या औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे उपोषण सुरु केले होते. विधानसभा निवडणूकांत सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या उपोषणाला महत्व प्राप्त झाले होते. आज शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर अजितदादा पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली. नंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी बाबा यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. अखेर त्यांच्या मागणीला मंजूरी देऊन बाबा आढाव यांनी आपलं उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

राज्यातील महायुतीला राक्षसी बहुमत मिळालेले आहे. महायुतीला २३६ जागा मिळालेल्या आहेत. तर एकट्या भाजपाला १३२ जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या निवडणूकीत पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर बाबा आढाव यांनी लोकशाहीची मुल्ये जीवंत राहावीत यासाठी आत्मक्लेश घेण्यासाठी पुण्याच्या महात्मा फुले यांच्या वाड्याजवळ उपोषण सुरु केले होते. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. ९४ वर्षी बाबा आढाव यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बाबा आढाव यांना भेटून उपोषण मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अजितदादा पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली. आम्हाला जास्त मत मिळाली यात आमचा काय दोष असा सवाल अजितदादांनी यावेळी केला.आम्ही जनतेचे पैसे जनतेला दिले. मध्यप्रदेश आणि कर्नाटकात आणि अन्य राज्यात अशा मोफत योजना राबविल्या जात आहेत. मग आम्ही योजना राबिविली त्याला आक्षेप का ? महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केलेच ना ? मग आमचा दोष कसा सवाल अजितदादांना आढाव यांनी केला.

हे सुद्धा वाचा

अखरे आंदोलन मागे घेतले

उद्धव ठाकरे यांनी राज्यात एवढे राक्षसी मतदान होऊनही कुठेच जल्लोष किंवा उत्साह दिसत नाही. आता सत्येमेव जयते नाही तर सत्ता मेव जयते सुरु आहे.  त्यामुळे या निकालाने राज्यातील जनता आनंदी झाल्याचे दिसत नाही. मतदाराला आपले मत नेमके कोणाला जाते हे जाणण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. केवळ पावतीवर चिन्ह दिसले हे पुरसे नाही. जर फेरमतदानाची मागणी केली तर लागलीच मान्य झाली पाहीजे अशी मागणी केली. तसेच इलेक्शन कमिशन विरोधला हा लढा असाच महाविकास आघाडी सुरु ठेवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बाबा आढाव यांचे वय ९४ वर्षे त्यांना आपण प्रथमच भेटत आहोत. ते म्हातारपण मान्य करत नाहीत आम्हाला त्यांचा आशीवार्द मिळाला आहे. त्यांनी उपोषण सोडावे त्यांचा लढा महाविकास आघाडी पुढे सुरु ठेवेले असे सांगत उद्धव ठाकरे यांना आढाव यांना पाणी प्यायला देत हे उपोषण सोडवले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.