साता-यात साई बाबांची 105 फुटांची मुर्ती; पाहायला लोकांची गर्दी
आमच्या वडिलांची प्रचंड इच्छा होती, की साता-यात असं श्रध्देचं स्थान असावं. त्यावर मी काही वर्षे विचार करून हा निर्णय घेतल्याचे मुर्ती स्थापना करणा-यांनी सांगितले.
सातारा – पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात निसर्गाची (nature) देणगी थो़डीसी वेगळी आहे, असं म्हणावं लागेल कारण प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही प्रवास करीत असताना तुमचं मन मोहून घेण्या-या अनेक गोष्टी तुम्हाला दिसतात. यात सातारकरांनी (satara) आणखी भर टाकली आहे. 105 फुट उंच असणारी साई बाबांची (sai baba) मुर्ती बसवण्यात आली आहे. ही मुर्ती एका साई भक्ताने आपल्या वडिलांच्या स्मृतिपितर्थ्य दिली असून मुर्तीच्या खालच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत वृध्दाश्रम सुरू करण्यात येणार आहे.
साई बाबांची मुर्ती सातार-यातील एका मुलाने वडिलांच्या इच्छेखातर वाई तालुक्यात बसवली असून ती बरोबर हायवेलगत असल्याने अनेक प्रवाशांचे मन मोहून घेत असल्याची चर्चा संपुर्ण सातारा जिल्ह्यात आहे. तसेच मुर्तीच्या उंचीचा विचार केल्यास 105 फुट उंची असल्याने अनेक प्रवासी तिथं थांबून दर्शन सुध्दा घेत आहेत.
आमच्या वडिलांची प्रचंड इच्छा होती, की साता-यात असं श्रध्देचं स्थान असावं. त्यावर मी काही वर्षे विचार करून हा निर्णय घेतल्याचे मुर्ती स्थापना करणा-यांनी सांगितले.
मुंबई-पुणे-सातारा-कराड-बंगलोर-कोल्हापूर-कोकण या ठिकाणी पर्यटनासाठी जाणा-या लोकांचे मन वेधून घेणारी मुर्ती असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. तसेच असं श्रध्दास्थान प्रत्येक ठिकाणी असावं अशी भावना पर्यटकांनी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे व्यक्त केली आहे.