पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट, यूपीएससीवरच केले उलट आरोप

पूजा खेडकर प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा खेडकरवर खोट्या माहितीच्या आधारे परीक्षा पास केल्याचा आरोप आहे. ज्याच्या विरोधात यूपीएससीने दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. यावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. पूजा खेडकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट, यूपीएससीवरच केले उलट आरोप
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 5:47 PM

पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात रिजॅाईंडर दाखल केले आहे. पूजा खेडकरने यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यूपीएससीच्या आरोपात तथ्य नसल्याचं पूजा खेडकरचे म्हणणं आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप यूपीएससीनं केला होता. पण नाव बदलल्याची माहिती आपण आधीच यूपीएससीकडे दिली असल्याचं पूजा खेडकरनं स्पष्टीकरण दिलं आहे. पूजा खेडकर प्रकरणी आता उद्या पुन्हा दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार यावर उद्या निर्णय होणार आहे.

पूजा खेडकरच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. याआधीच यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. इतकंच नाही तर पूजा खेडकर यांना पुन्हा परीक्षेला बसता येणार नसल्याचं देखील यूपीएससीने म्हटलं होतं. पूजा खेडकर प्रकरण अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत आलं होतं. खोटी माहिती सादर करुन परीक्षा पास झालेल्या आरोप पूजा खेडकरवर होता. पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीने गुन्हा दाखल केला होता. अटक होऊ नये म्हणून आधीच पूजा खेडकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केलाय. पूजा खेडकरला जामीन मिळाल्यास चौकशीत त्या सहकार्य करणार अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

पूजा खेडकरवर वेगवेगळ्या नावाने यूपीएससी परीक्षेत अर्ज दाखल केल्याचा आरोप आहे. परीक्षेसाठी वेगवेगळ्या नावाने अर्ज दाखल केल्यामुळे सिस्टमला त्या किती वेळा परीक्षेला बसल्या याची माहिती मिळत नव्हती. पण हे प्रकरण समोर आल्यानंतर यूपीएससीने २००९ ते २०२३ या १५ वर्षांपासूनच्या यूपीएससीच्या १५,००० पेक्षा जास्त शिफारस केलेल्या उमेदवारांच्या उपलब्ध डेटाची तपासणी केली होती. पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या प्रकरणाशिवाय, कोणत्याही इतर उमेदवाराला नियमानुसार परवानगी असलेल्या संख्ये पेक्षा जास्त प्रयत्न केल्याचे आढळून आले नाही.

पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या एकट्या प्रकरणात यूपीएससीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिड्युर (एसओपी) नाव आणि पालकांचे नाव बदलल्यामुळे शोधू शकली नाही. पूजा खेडकर यांनी जाणीवपूर्वक खोट्या माहितीच्या आधारावर अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांची संधी हुकली असा आरोप ही सरकारी वकिलांनी कोर्टात केला होता. पूजा खेडकर यांच्या प्रकरणात आता जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. कोर्टाने जर जामीन फेटाळला तर मात्र त्यांना अटक होऊ शकते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.