‘राज ठाकरे यांच्याशी संबंध चांगले म्हणून उद्धव ठाकरे यांनी…’, रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवार हुशार आहेत. त्यांना बारामतीचा तेल लावलेला पैलवान म्हणतात. त्यांनी अनेक राजकीय पावसाळे पाहिलेत. शिवसेना ही कुणाची हे निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर आता पुन्हा वाद सुरू आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही.

'राज ठाकरे यांच्याशी संबंध चांगले म्हणून उद्धव ठाकरे यांनी...', रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट
RAMDAS KADAM, RAJ THACKERAY, UDDHAV THACKERAYImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 8:29 PM

रत्नागिरी : 8 ऑक्टोबर 2023 | देवेंद्रजी आणि मी विधीमंडळामध्ये 30 वर्षे एकत्र होतो. त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. आताचे सरकार ते काम नक्की करतील. मनसेने टोल हा विषय घेऊन आंदोलन केले. हा विषय काही नवीन नाही. पण, शासनाचे नुकसान होऊ नये याचा विचार राज ठाकरे यांनी करावा. टोल मुक्त महाराष्ट्र झाला तर आनंदच आहे. पण, ज्यांनी ती पाटी फोडली त्यांचे माझ्याकडून अभिनंदन. उद्धव ठाकरे यांच्या आधी राजकारणात राज ठाकरेंनी सुरुवात केली. त्यांनी आणि मी सोबत काम केलं आहे. त्यांच्याबाबत एक गोष्ट चांगली आहे ती येणाऱ्या माणसांना प्रत्येकाला भेटतात अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. काही ग्रामीण भागात जाऊन शेताच्या बांधावर सुद्धा उभे राहत नाही ही गोष्ट वाईट आहे, असा टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर डूख ठेवला

राज ठाकरे यांच्यावर खूप अन्याय झाला आहे. उद्धव ठाकरे यांना ज्यावेळी अध्यक्ष केले त्यावेळी त्यांना अध्यक्ष केले असते तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता. राज ठाकरे यांच्यासोबत माझे संबंध चांगले होते म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर डूख ठेवला. त्यांच्या त्यांच्या संपर्कात जी लोक होती त्यांना खाली खेचण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केलं अशी टीका रामदास कदम यांनी केली.

सोनिया गांधींचे पाय चाटतात

शिवसेनाप्रमुख यांचा आशिर्वाद माझ्या पाठी होता म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. मुख्यमंत्री व्हावे ही सगळ्यांचीच इच्छा असते. उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री झाले. पण बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून. ज्यावेळी काँगेस सोबत दुकान थाटावे लागेल. त्या दिवशी मी पक्ष बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मात्र, आताचे नेते सोनिया गांधींचे पाय चाटतात असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांच्यावर अन्याय झालेला आहे. बाळासाहेबांची छबी राज ठाकरे यांच्याकडे आहे. पण, त्यांच्यासोबत जे जे सोबत होते त्यांची खाट उद्धव ठाकरेनी टाकली. राज ठाकरे यांच्याकडे कोण बसते यांची माहिती ते काढत. ही माहिती मातोश्रीवर पोहोचली की त्यांचे पुढचे उद्योग सुरु होत. उद्धव ठाकरे याने हेच काम केले. मी ही राज ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे मलाही त्रास झाला, असे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....