Nagpur Murder : कौटुंबिक वादातून मुलाने केली बापाची हत्या, काका-काकूसोबत संगनमत करुन जन्मदात्याला संपवले

या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन मोठे वडील आणि मोठ्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Nagpur Murder : कौटुंबिक वादातून मुलाने केली बापाची हत्या, काका-काकूसोबत संगनमत करुन जन्मदात्याला संपवले
कौटुंबिक वादातून मुलाने केली बापाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 5:28 PM

नागपूर : कौटुंबिक वादातून एका विधिसंघर्ष मुलाने आपल्या वडिलांना बेदम मारहाण (Beating) करीत त्यांची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना नागपूरमधील खापरखेडा येथे घडली आहे. मुलाने आपल्या मोठ्या काका काकूसोबत संगनमत करत वडिलां (Father)ची हत्या केली असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली आहे. जगमोहन शाक्य असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन मोठे वडील आणि मोठ्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

किरकोळ वादातून हत्येचा गुन्हा

जगमोहन यांच्यासोबत पटत नसल्याने त्यांची पत्नी एका मुलासह वेगळ्या राहतात, तर मोठे भाऊ ब्रीजमोहन आणि त्यांची पत्नी हे एकत्र राहायचे. ब्रीजमोहन यांना अपत्य नसल्याने त्यांनी जगमोहन यांच्या मुलाला आपल्याकडे ठेवले होते. काल रात्री जगमोहन आणि ब्रीजमोहन यांच्यात वाद सुरू झाला. बघता-बघता वाद इतका विकोपाला गेला की विधिसंघर्ष बालकासह ब्रीजमोहन आणि त्यांच्या पत्नीने लाथा-बुक्क्यांनी जगमोहन यांना मारहाण केली. यासंदर्भात जगमोहन यांच्या पत्नीला माहिती समजताचं त्यांनी शेजाच्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे.

सांगलीत घरगुती वादातून भावाकडून भावाची हत्या

घरी दारुन पिऊन येतो आणि शिवीगाळ करतो म्हणून सांगलीत लहान भावाने मोठ्या भावाची डोक्यात नारळ सोलण्याची मशिन घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. भावाची हत्या केल्यानंतर अपघाती मृत्यूचा बनाव आरोपीने डॉक्टर आणि पोलिसांसमोर केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी घटनास्थळाची नीट पाहणी केली. तसेच आरोपीच्या घरच्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हत्येचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. (A minor boy along with his uncle and aunt killed his father over family dispute in nagpur)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.