पुण्यातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन आहे तरी काय? पालिकेच्या आयुक्तांचं नियोजन काय?
पुणे शहरात एकूण 21 ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारले जाणार असून पालिकेने त्यासाठी खास नवी योजना आखली आहे.
पुणे : मुंबईनंतर वाहतुक कोंडी होणारं शहर म्हणून राज्यात पुण्याची ओळख बनली आहे. वाहतुक कोंडी अक्षरशः पुण्यात गुदमरायला होतं, त्यामुळे पुण्याची वाहतुक कोंडी म्हणजे डोक्याला ताप आणणारी आहे. वाहनधारकांना कितीतरी तास हे प्रवासातच घालवावे लागतात. त्यामुळे पुण्याची वाहतुक कोंडी म्हंटलं की वाहनचालकांनाच्या अंगावर काटा आणणारी परिस्थिती निर्माण होते. हीच परिस्थिती सोडवण्यात नेहमीच अपयशी ठरलेली पालिका यंत्रनेसह पोलीस प्रशासन आता नव्याने प्रयोग करू पाहात आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी एकत्रित दौरा करत काही बैठका घेतल्या होत्या. त्यावर काही सूचना मांडण्यात आल्या होत्या. पुण्यातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी वेळोवेळी झालेल्या बैठकीमधून आता पालिकेने मास्टर प्लॅन आखला आहे. राज्य सरकारच्या आर्थिक मदतीने अंमलबजावणी होणार आहे.
पुणे शहरातील काही ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहे. वारंवार होणारे अपघात आणि वाहतुक कोंडीच्या ठिकाणाचा अभ्यास करण्यात आला असून त्यावर काही उपाय सुचविण्यात आले होते.
त्यामध्ये वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्पाचा आराखडा लवकरच सादर केला जाणार आहे.
पुणे शहरात एकूण 21 ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारले जाणार असून पालिकेने त्यासाठी खास नवी योजना आखली आहे.
वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला मिळणार दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे.
पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार याबाबत लवकरच प्रकल्प आराखडा सादर करणार असून प्रकल्प कसा आणि कधी पूर्ण होणार याबाबत माहिती देणार आहे.