Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याच्या विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, जागेची केली पाहणी

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, विद्यापीठ प्रशासनाने पुतळा उभारणीबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्याव्यात. त्या कामासाठी लागावे.

पुण्याच्या विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, जागेची केली पाहणी
मंत्री छगनभुजबळ यांनी विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासाठी जागेची पाहणी केली.
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 2:48 PM

पुणेः पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत आहे. या इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. येत्या 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या दिनानिमित्त पुतळा उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती गुरुवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जागेची केली पाहणी

भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील प्रत्यक्ष जागेची आज गुरुवारी पाहणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ज्येष्ठ संशोधक हरी नरके, डॉ. संजय चाकणे, डॉ. महेश आबाळे, डॉ. सुधाकर जाधवर, प्रसनजीत फडणवीस, डॉ. मनोहर चासकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

निर्णयासाठी लवकरच बैठक

मंत्री भुजबळ म्हणाले की, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर पुतळा उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लवकरात लवकर पुढील निर्णय घेण्यात येईल.

सविस्तर प्रकल्प अहवाल मागवला

विद्यापीठ प्रशासनाने पुतळा उभारणीबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्याव्यात. त्या कामासाठी लागावे. त्याचप्रमाणे विद्यापीठ आवारात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी मिळण्याकरिता तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. आता मंत्री भुजबळ यांनीच या कामात लक्ष घातल्याने ती लवकर मार्गी लागतील, असे मानले जात आहे.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी म्हणजेच येत्या 3 जानेवारी रोजी हा पुतळा उभारावा असा प्रयत्न असेल. त्यासाठी विद्यापीठाने आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात. सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवून द्यावा, अशी सूचना केली आहे. – छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

इतर बातम्याः

Pawar’s friendship: शरदाच्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण, हिरव्यागार दोस्तांचा बहारदार मळा अन् फुलांचे गाव!

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी

मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी संस्थांना लागू करा; शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात नाशिकमध्ये मागणी

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.