पुणेः पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत आहे. या इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. येत्या 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या दिनानिमित्त पुतळा उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती गुरुवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
जागेची केली पाहणी
भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील प्रत्यक्ष जागेची आज गुरुवारी पाहणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ज्येष्ठ संशोधक हरी नरके, डॉ. संजय चाकणे, डॉ. महेश आबाळे, डॉ. सुधाकर जाधवर, प्रसनजीत फडणवीस, डॉ. मनोहर चासकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निर्णयासाठी लवकरच बैठक
मंत्री भुजबळ म्हणाले की, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर पुतळा उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लवकरात लवकर पुढील निर्णय घेण्यात येईल.
सविस्तर प्रकल्प अहवाल मागवला
विद्यापीठ प्रशासनाने पुतळा उभारणीबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्याव्यात. त्या कामासाठी लागावे. त्याचप्रमाणे विद्यापीठ आवारात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी मिळण्याकरिता तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. आता मंत्री भुजबळ यांनीच या कामात लक्ष घातल्याने ती लवकर मार्गी लागतील, असे मानले जात आहे.
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी म्हणजेच येत्या 3 जानेवारी रोजी हा पुतळा उभारावा असा प्रयत्न असेल. त्यासाठी विद्यापीठाने आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात. सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवून द्यावा, अशी सूचना केली आहे.
– छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
VIDEO : Pune | CNG Price Hike : पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किलोमागे मोजावे लागणार इतके रूपये – tv9#cng #CNGprice #Hike #Pune pic.twitter.com/cRg4CZkkRJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
इतर बातम्याः