Aaditya Thackeray On Raj Thackeray: मशिदीवरचे भोंगे हटवण्यापेक्षा, आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना थेट सल्ला
Aaditya Thackeray On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी मनसेला घेरले आहे, तर मनसे मात्र या मुद्द्यावरून आक्रमक झालेली दिसत आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी मनसेला घेरले आहे, तर मनसे मात्र या मुद्द्यावरून आक्रमक झालेली दिसत आहे. भाजपनेही मनसेला (mns) या मुद्द्यावर पाठिंबा दिल्याने मनसेला बळ मिळालं आहे. या मुद्द्यावरून राजकारण रंगलेलं असतानाच आता राज्याचे पर्यावरण मंत्री आणि राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी राज यांना नाव न घेता सल्ला दिला आहे. वाढत्या महागाईवर बोललं गेलं पाहिजे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या बाबत बोललं पाहिजे. गेल्या 60 वर्षावर नव्हे तर दोन ते तीन वर्षावर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी राज यांना दिला आहे. त्यामुळे पुतण्याचा सल्ला काका मानतात का? किंवा त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या अल्टिमेटमवर विचारण्यात आले असता त्यांनी हे उत्तर दिलं. देशात महागाई वाढत आहे. लोक त्रस्त आहेत. त्यामुळे इंधनाच्या वाढत्या दरावरही बोललं पाहिजे. लोकांच्या समस्यांवर बोललं पाहिजे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांचा अल्टिमेटम
राज ठाकरे यांनी आधी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कात सभा घेतली होती. त्यानंतर 12 एप्रिल रोजी ठाण्यात मोठी सभा घेतली होती. या दोन्ही सभेतून त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली होती. मशिदीवरील भोंगे नाही हटवल्यास हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ठाण्यातील सभेत तर त्यांनी राज्य सरकारला थेट डेडलाईनच दिली होती. 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे नाही हटवले तर मंदिरासमोर भोंगे वाजवू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आज आदित्य ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून त्यांना सल्ला दिला आहे.
Instead of removing loudspeakers (on MNS’ Raj Thackeray’s mosque remark), one should use the same to speak about rising inflation…One should speak about petrol, diesel or CNG and should notice the recent 2-3 years, not the last 60 years: Maharashtra Minister Aaditya Thackeray pic.twitter.com/Dwg01A6zCR
— ANI (@ANI) April 15, 2022
संबंधित बातम्या:
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून वाद चिघळला, कोल्हापुरात भाजपचा मोर्चा