Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ, Aaditya Thackeray यांचं मोठं विधान

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावर मोठं विधान केलं आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून रिफायनरीवर चर्चा होत आली आहे. परत परत प्रस्ताव येत असतात. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही याची दक्षता घेऊनच आपण पुढे जाऊ.

VIDEO: प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ, Aaditya Thackeray यांचं मोठं विधान
aaditya thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 11:14 AM

रत्नागिरी: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी नाणार प्रकल्पावर (nanar refinery) मोठं विधान केलं आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून रिफायनरीवर चर्चा होत आली आहे. परत परत प्रस्ताव येत असतात. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला (environment) काही हानी होणार नाही याची दक्षता घेऊनच आपण पुढे जाऊ. थोडं प्लानिंग करून पुढे जाऊ. रिफायनरी प्रकल्पासाठी जागा शोधायचा प्रयत्न सुरू आहे. वाड्या वस्त्या नसतील, गावं नसतील अशा जागा शोधत आहोत. कुठेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच तो प्रकल्प आला तर आम्ही त्याला पुढे मान्यता देऊ, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प मार्गी लागण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मीडियाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

कुठेही चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून त्यांचे न्याय हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचं नुकसान होणार नाही आणि त्यांचा विश्वास संपादन करून आम्हाला पुढे जायचं आहे. कुणाच्याही विश्वासाला तडा देऊन आम्हाला पुढे जायचं नाही. नाणारचे दोन्ही बाजूचे शिष्टमंडळ मला भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कोकणाचा शाश्वत विकास करणार

कोविड कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा फिरायला सुरुवात झाली आहे. गर्दी वाढू लागली आहे. कोविडमध्ये बंधनं होती. तरीही कामे कमी होती. कोविडच्या काळात पायाभूत सुविधांची कामे थांबली नव्हती. चिपी विमानतळ आणि मेडिकल कॉलेजची कामे सुरू होती. सिंधुरत्न स्किम सुरू केली. कोकणातील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, कचरा या गोष्टीवर लक्ष देऊन काम सुरू आहे. आम्ही कोकणाचा शाश्वत विकास करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

राजकीय गोष्टी निवडणुकीत होतातच

कोकण दौऱ्याच्या निमित्ताने राजकीय मोर्चेबांधणी आहे का? या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. राजकीय मोर्चेबांधणीपेक्षा आपण पर्यटन, पर्यावरण आणि कोकणाच्या विकासावर अधिक फोकस दिला आहे. या पूर्वी पर्यटन आणि पर्यावरणावर फोकस कमी असायचा. राहिलं राजकीय मोर्चेबांधणीचं तर राजकीय गोष्टी निवडणुकीच्या काळात होतच असतात, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

भाजपची काळी जादू चालणार नाही, सरकार पाच वर्ष पूर्ण करणार; Nana Patole यांना विश्वास

Maharashtra News Live Update : राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ होणार

जळगावमध्ये कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा; मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली नसतानाही दाम्पत्याला बेदम मारहाण

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.