भाषणाच्या मध्येच अजान सुरू झाली, मग गडकरींनी सर्वांची मनं जिंकली, पाहा सांगलीमध्ये नेमकं काय घडलं?

सांगलीच्या मिरजमध्ये नितीन गडकरी यांची प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

भाषणाच्या मध्येच अजान सुरू झाली, मग गडकरींनी सर्वांची मनं जिंकली, पाहा सांगलीमध्ये नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 8:45 PM
सांगलीच्या मिरजमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती जनतेला दिली. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार कोटी दिले, 9 कामं पूर्ण झाले 9 प्रगती पथावर आहेत. अजून कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर केली आहेत, ती लवकरच सुरू होतील. मुंबई ते बंगळुरू पंचावन्न हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे, त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. पुणे, बंगळुरू हा हायवे 800 किलोमीटर आहे. तुम्हाला सहा तासांमध्ये बंगळुरूवरून पुण्याला सहज पोहोचता येईल असा आपला प्रयत्न आहे.  सगळीकडे हिरवं पाहायला मिळाले,यामुळे मनापासून मला आनंद होत आहे. गावाच्या विकासासाठी पाण्याची खूप आवश्यकता आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपण संवर्धनामध्ये  काम करत आहोत,  त्यामध्ये डॉक्टरेट पद देखील मिळालं आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
दरम्यान नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असतानाच मध्येच अजान सुरू झाली. अजान सुरू झाल्यानंतर नितीन गडकरी यांना भाषण थांबवण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी देखील अजान संपेपर्यंत आपलं भाषण थांबवलं.
पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, पश्चिम महाराष्ट्रातील ऊस कारखाने चालवणं म्हणजे मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे.  विदर्भ म्हणजे शंभर टक्के नापास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे. आज नद्यांचे, तलावांचे खोलीकरण झाल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. नॉन युरीया खतामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. इथेनॉल निर्मितीमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यानं आता खऱ्या अर्थानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. भविष्यात पेट्रोलची कमतरता भासू शकते, इंडियन ऑईल महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये इथेनॉलचे 400 पंप सुरू करणार आहेत, पाच कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करणार आहेत. शेतकऱ्यांनो तुमच्या मुलांनी जर इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या वापरल्या तरच तुमच्या उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची मागणी वाढणार आहे, असंही यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.