असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का?; अब्दुल सत्तार जेव्हा अधिकाऱ्यांवर भडकतात…
घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी पाहून राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अधिकाऱ्यांवर प्रचंड भडकले. (abdul sattar addressing panchayat samiti meeting in aurangabad)
औरंगाबाद: घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी पाहून राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अधिकाऱ्यांवर प्रचंड भडकले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत असे काम तुमच्या बापने कधी केले होते का? असा सवाल केला. सत्तार यांचा हा रुद्रावतार पाहून बैठकीतील वातावरण अधिकच तापलं होतं. (abdul sattar addressing panchayat samiti meeting in aurangabad)
अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील सोयगाव मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला तहसीलदारांपासून सर्वच अधिकारी उपस्थित होते. यावेळी घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी पाहून सत्तार यांचा पारा चढला. या यादीवरून त्यांनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत तुम्ही फुकटचा पगार घेता का? असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का? असा सवाल केला. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं.
तुम्हाला पगार मिळत नाही का?
जशीच्या तशी यादी छापून देता. तुमच्या बापाने कधी अशी यादी पाहिली होती का? यादीवर टिप्पणी करावी लागते, हे सुद्धा तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला पगार मिळत नाही का? पंचायत समितीत फुकटचे काम करता का? दलालासारखे पैसे मिळतात तेव्हा कसे खूश होता. मग सामान्यांची कामे करता येत नाही का? असे सवाल सत्तार यांनी यावेळी केले.
भिकारचोट धंदे बंद करा
गरीबांना न्याय देण्याची तुमची भूमिका पाहिजे. त्यांना घरकूल योजनेचा लाभ कसा मिळेल याबाबत तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. पण तुम्ही भिकारचोट धंदे सुरू केले आहेत. हे धंदे बंद करा, राक्षसाची औलादही अशी नसेल, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
एक रुपया जरी खाल्ला तर याद राखा
लोकांच्या ज्या योजना आहेत. त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करा. 28 फेब्रुवारीपर्यंत या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत. मी कोणत्याही ग्रामपंचायतीत जाऊन पाहणी करेल. कोणत्याही घरकूलधारकाला जाऊन भेटल. त्यांच्याकडून माहिती घेईल. मला जर तुम्ही या घरकूलधारकांकडून एक रुपया जरी खाल्ल्याचं कळलं तर माझ्या इतका वाईट माणूस कुणीच नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (abdul sattar addressing panchayat samiti meeting in aurangabad)
तहसीलदारांना सूचना
गरीबांच्या घरकूल योजना पूर्ण करा. त्यानेच आम्हाला सत्ता दिली. तो आमचा मालक आहे. तो आमचे कान धरू शकतो. त्याने आम्हाला सरकार दिलं. तुमचा पगार देण्यासाठी त्याने आम्हाला सत्तेत बसवलेलं नाही, असं सांगतानाच कोणी आदिवासी आहेत, कोणी मातंग आहेत तर कोणी अपंग आहे. या गरीब माणसाला घरकूल योजनेचा पहिला हप्ता द्या. त्याच्या अडचणी समजून घ्या, त्या सोडवा. त्याला रेती आहे की नाही याची विचारपूस करा, असंही ते म्हणाले. तसेच तहसीलदारांनी स्वत: या कामावर लक्ष ठेवावं, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (abdul sattar addressing panchayat samiti meeting in aurangabad)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 15 February 2021https://t.co/vKXoPEQ80V#Mahafast #Video
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ‘ईडी’कडून ‘एमएमआरडी’च्या आयुक्तांना समन्स
दुसरं लग्न का केलं? भावा-भावातील वाद टोकाला, हत्याकांडाने अमरावती थरारलं
निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन
(abdul sattar addressing panchayat samiti meeting in aurangabad)