सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी गुवाहाटी न जाता सूरतहून परतलेल्या आमदाराच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. ठाकरे गटातून एक खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलीय.

सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी गुवाहाटी न जाता सूरतहून परतलेल्या आमदाराच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 5:41 PM

अकोला : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. ठाकरे गटातून एक खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलीय. राज्यातील अभूतपूर्व सत्तांतराच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांसोबत गेलेले आणि गुवाहाटीला न जाता सूरतहून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आलीय. नितीन देशमुख यांना मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीसमधून देण्यात आले आहेत. त्यासाठी नितीश देशमुख यांना 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नितीन देशमुख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला या विषयावर प्रतिक्रिया दिली. “नोटीसच्या बाबतीत वारंवार अशा चुकीच्या पद्धतीने कामकाज चालवून चुकीच्या पद्धतीने कुणाला कसा त्रास द्यायचा हेच या सरकारचं चाललं आहे. काही दिवसांपूर्वी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. नागपूरच्या अधिवेशनावेळी माझ्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. आता एसीबीची नोटीस आली”, असं नितीन देशमुख म्हणाले.

’17 जानेवारीला भूमिका मांडणार’

हे सुद्धा वाचा

“या संदर्भात मला 17 तारखेला अमरावतीला बोलावलं आहे. मी 17 तारखेला अमरातीला एसीबीच्या ऑफिसला जाईन. माझं काय म्हणणं आहे ते मांडेन. पण एसीबीची नोटीस देण्यात आली त्याविषयी तक्रार नेमकी कुणाची आहे, त्यावर एसीबीचं काय म्हणणं आहे, आमच्याकडे कोणती मालमत्ता आहे, याबाबत कोणतंही स्पष्टीकरण नाही. आमदाराला नोटीस बजवायची पण तक्रारदार कोण? तो कोणत्या वृत्तीचा? त्याचं नावही आम्हाला माहीत नसतं. याबाबत मी रितसर 17 तारखेला पत्रकार परिषद घेईन आणि माझं स्पष्टीकरण मांडेन”, असं नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं.

“विशेष कारण काय, अनिल परब अधिवेशनात बोलले त्यांना दुसऱ्या दिवशी ईडीची नोटीस आली. मी अधिवेशनात बोललो, आता मला एसबीची नोटीस आली. आम्हाला अशा नोटीशीचा काय फरक पडणार नाही. कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोकं आहोत. आमच्याजवळ काही चुकीच्या पद्धतीने मिळवलेली मालमत्ता नाहीय”, असं नितीन देशमुख म्हणाले.

“सुरुवातीला ज्यावेळेस एसीबीची नोटीस आली तेव्हा वर संपर्क साधा, असं सांगण्यात आलं होतं. आता तो संपर्क कुणाला साधा ते सर्वजण समजू शकतात”, असंदेखील नितीन देशमुख म्हणाले.

“आम्हाला कुणाचीही नोटीस आली, अगदी तुरुंगातही टाकलं तरी आम्ही ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहू”, असं नितीन देशमुख ठामपणे म्हणाले.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....