शंकर देवकुळे, सांगली, दि. 11 जानेवारी 2024 | सांगली शहरातच नव्हे तर परिसरात सध्या गाढवांच्या विषयाची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे सांगली मनपाचे प्रशासन जागे झाले आहे. महानगरपालिकेने गाढवांविरोधात कारवाई सुरु केली आहे. गाढवामुळे झालेल्या अपघाताचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओनंतर महानगरपालिकेने भटक्या गाढवांविरोधात जोरदार कारवाई केली आहे. नेटकऱ्यांनी सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली. त्यानंतर मनपा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवून नऊ गाढवे पकडण्यात आली.
सांगली शहरातील प्रमुख मार्ग, अंतर्गत रस्त्यांवर भटक्या जनावरांची संख्या मोठी आहे. या जनावरांमुळे राजरोस अपघात होत असतात मात्र, यांचा बंदोबस्त केला जात नाही. सांगली शहर आणि परिसरात अनेक रस्त्यावर मोकाट गाढव फिरत असतात. मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असते. मात्र, अपघात झाल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या विरोधात कॉमेंट सुरु झाल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली.
सोशल मीडियावरील व्हिडिओनंतर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होऊ लागली. त्यानंतर मनपाने विशेष मोहीम राबवून नऊ गाढवे पकडली. मात्र, एका दिवसासाठी ही मोहीम राबवून चलणार नाही. मनपाने सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. कारण सांगली महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असतात. त्यात शहरातील गावभाग परिसरात तर मोकाट गाढवांची संख्या मोठी आहे. यासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कारवाई झाली नव्हती.
रस्त्यावरील गाढवामुळे कसा झाला अपघात, पाहा थरार pic.twitter.com/aNl0y8132K
— jitendra (@jitendrazavar) January 12, 2024
एका मोकाट गाढवामुळे अपघात झाल्याचा हा व्हिडिओ आहे. रस्त्यावरुन जाणारा मोटारसायकलस्वार अचानक आलेल्या गाढवामुळे गाडीवरुन पडल्याचे दिसत आहे. पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. हरीपुर रोडवर हा अपघात झाला आहे. या अपघातात तरुण जखमी झाला. मात्र, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होताच महापालिका प्रशासनाला जाग आली.