किल्ले रायगडाच्या पायथ्याशी भीषण अपघात, खासगी बस 50 फूट दरीत कोसळली
रायगडच्या पायथ्याशी भीषण अपघाताची घटना घडली आहे. एक खासगी बस 50 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावाजावळ खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. पाचाड आणि कोंझर दरम्यानच्या घाटात भीषण अपघात झालाय. घाटातील अवघड वळणावर नियंत्रण सुटल्याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात प्रवाशांना दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही रायगडहून ऐरोलीच्या दिशेला जात होती. या दरम्यान पाचाड आणि कोंझर दरम्यान ही बस घाटात 50 फूट खोल दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्याचं पाहून अनेकांचा थरकाप उडाला. घाटात अवघड वळणावर चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी घडलेल्या घटनेत सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या गावच्या गावकऱ्यांनी आणि घाटातून जाणाऱ्या इतर वाहानातील प्रवाशांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. यानंतर पोलीस आणि महाड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करण्यात येत आहे.
कोल्हापुरात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
दरम्यान, कोल्हापुरात आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील निपाणी जवळील तवंदी घाटातहा भीषण अपघात घडला. कंटेनर फोर व्हीलर आणि टू व्हीलरची एकमेकांना धडक दिली. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले.