Nashik Accident:अपघातांची मालिका थांबणार कधी? नाशिक-सिन्नर महामार्ग ठरतो आहे का मृत्यूचा सापळा?

शुक्रवारी सिन्नर -शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहेत. यानंतर तरी अपघात रोखण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्या.

Nashik Accident:अपघातांची मालिका थांबणार कधी? नाशिक-सिन्नर महामार्ग ठरतो आहे का मृत्यूचा सापळा?
nashik shirdi highway accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 2:21 PM

नाशिक : नाशिक-सिन्नर महामार्गावर (Nashik Bus accident)गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र होत आहे. त्यात पुन्हा एका अपघाताची भर शुक्रवारी पडली. गेली अनेक महिने अपघात होत आहे. परंतु हे अपघात रोखण्यासाठी काय गेले आहे? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. शुक्रवारी सिन्नर -शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहेत. यानंतर तरी अपघात रोखण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्या.

यापुर्वी कधी झाले अपघात

  • ८ डिसेंबर रोजी महामार्गावरील पळसे येथे महामंडळाच्या दोन बसेस पेटल्या. तीन मोटारसायकल आणि मोटार यांच्या अपघातात एक बस पेटली. या विचित्र अपघातात बसमधील चार जणांचा मृत्यू झाला होता.
  • ९ डिसेंबर रोजी मोहदरी घाटात अपघात होऊन पाच तरुणांचा मृत्यू झाला.सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले होते.
  • ८ ऑक्टोंबर रोजी नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात बसला आग लागली. या आगीत १२ प्रवाशी जिवंत होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
  • २ नोव्हेंबर रोजी पुणे नाशिक मार्गावर सिन्नर जवळ पुन्हा एक शिवशाही बस आगीत भस्मसात झाली. या घटनेतही प्रवाशी हे थोडक्यात बचावले होते.
  • गेल्या तीन चार महिन्यात छोटे-मोठे अनेक अपघातही झाले आहेत.
  • का होतात अपघात राज्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. नेमकी कारणं काय? पाहू या…
  • वाहन चालवताना चालकांचे वेगावर नियंत्रण नसणे
  • मद्य पिऊन वाहन चालवणे, अधिक वेळ वाहन चालवणे
  • धोकेदायक पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेन कटिंग करणे
  • क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे
  • गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे
  • इतर वाहतूक नियमांचे पालन न करणे

लोकांनी आणि सरकारी यंत्रणे ठरवल्यास या कारणांमुळे होणारे अपघात सहज टाळता येईल. यासंदर्भात साम, दाम, दंड, भेद अशा उपाययोजना करायला हव्या. त्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होईल. परंतु सरकारी यंत्रणा आपल्या पारंपारीक कामकाज पद्धतीनेच चालतात. वाहन चालवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.