नाशिकमध्ये जमीन घोटाळा, उद्योजकाने खोटा पुरावा देत बारा ठिकाणी घेतली जमीन?
Nashik News | नाशिक शहरात जमीन घोटाळ्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. एका व्यक्तीने खोटा पुराव देऊन बारा ठिकाणी जमीन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यभरात काही ठिकाणी अशाच रीतीने बोगस दाखला दाखवून जमिनी खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चंदन पुजाधिकारी, नाशिक, दि. 28 नोव्हेंबर 2023 | नाशिकमध्ये पुन्हा एकदा जमीन घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक अशोक कटारिया यांनी शेतकरी असल्याचा खोटा पुरावा देत नाशिकच्या सिन्नर तालुक्यात तब्बल बारा ठिकाणी जमीन खरेदी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी यांनी केला. तसेच अशोक कटारिया यांनी नाशिक जिल्ह्यातील इतर भागात आणि राज्यभरात काही ठिकाणी अशाच रीतीने बोगस दाखला दाखवून जमिनी खरेदी केल्याचा संशय सुगंधी यांनी व्यक्त केलाय.
काय आहे प्रकार
ल प्रसिद्ध उद्योजक अशोक कटारिया यांनी शेतकरी असल्याचा खोटा पुरावा दिल्याचा आरोप होत आहे. नाशिकमधील या जमीन प्रकरणाची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सिन्नरच्या तहसीलदारांनी देखील चौकशी करून कार्यवाही केली होती. प्रशासनाने केलेल्या चौकशीत अशोक कटारिया यांचा उतारा खोटा असल्याचा उघडकीस झाले आणि प्रशासनाने अशोक कटारिया यांना सर्व जमिनी सरकार दप्तरी जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात उद्योजक अशोक कटारिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयात या प्रकरणी प्रशासनाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. प्रशासनाने देखील उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
अशोक कटारिया यांनी फेटाळले आरोप
सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी यांनी केलेल्या आरोपांबाबत अशोक कटारिया यांच्या वकिल श्वेता वाघ यांनी बाजू मांडली. श्वेता वाघ यांनी म्हटले की, कटारिया यांच्यावर केलेले आरोप बिनगुडाचे आहे. त्याचा खुलासा करण्यात आलाय. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे या प्रकारचे आरोप करणे हा कोर्टाचा अवमान करण्यासारखे आहे. जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, तोपर्यंत या विषयी कोणतीही टीका करु नये, असे श्वेता वाघ यांनी म्हटले आहे.