ठाकरे गटाला ‘या’ जिल्ह्यातही मोठा धक्का; माजी आमदाराचे या कारणामुळे संचालकपद गेले

लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी लेखी आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाटील यांना पुढील 5 वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नसल्याचेही त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाकरे गटाला 'या' जिल्ह्यातही मोठा धक्का; माजी आमदाराचे या कारणामुळे संचालकपद गेले
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 10:58 PM

उस्मानाबादः राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला वेगवेगळे राजकीय धक्के बसत आहेत. एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील वेगवेगळ्या स्थानिक संस्थांमध्येही धक्के बसत आहे. असाच प्रकार उस्मानाबाद येथे उद्धव ठाकरे गटाला उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा धक्का बसला आहे.

भूम परंडा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे संचालक पद अपात्र ठरविण्यात आले आहे.

त्यांना 2 पेक्षा जास्त आपत्य असल्याचे कारण देत ज्ञानेश्वर पाटील यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद गेले आहे. माजी आमदार पाटील यांचे भूम परंडा मतदार संघात प्राबल्य असून ते एकेकाळी मंत्री सावंत यांचे निकटवर्तीयही समजले जात होते.

तर दुसरीकडे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत याचे पुतणे तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या तक्रारीनंतर ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी लेखी आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाटील यांना पुढील 5 वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नसल्याचेही त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी संचालक पदाच्या निवडणुकीत त्यांनी 2 पेक्षा जास्त असलेली इतर अपत्य नमूद केली नाहीत अशी तक्रार धनंजय सावंत यांनी केली होती.

त्या प्रकरणावरूनच हा वाद पेटला होता. ज्ञानेश्वर पाटील यांचा पहिला विवाह हा सिंधू यांच्यासोबत झाला होता मात्र त्यांचे निधन झाले. सिंधू यांच्यापासून पाटील यांना पहिले अपत्य 7 मार्च 1993 रोजी झाले होतेत तर दुसरे आपत्य 12 ऑगस्ट 1995 रोजी झाले होते.

त्यानंतर पाटील यांनी राणी उर्फ उषा यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्यापासून त्यांना 2 आपत्य झाली होती. त्यातील पहिले अपत्य हे 15 सप्टेंबर 2006 व दुसरे 15 ऑक्टोबर 2008 रोजी झाले होते.

या चारही अपत्य यांच्या नोंदी नगर परिषद बार्शी येथे करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर पाटील हे यापूर्वी 2009 मध्ये जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आले होते.

मात्र त्यांना 2001 नंतरचे 2 अपत्य असल्याने संचालक पद रद्द करण्याची मागणी धनंजय सावंत यांनी केली होती त्यानंतर आजही कारवाई करण्यात आली.

पाटील यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी अपत्यांची माहिती लपवली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.