अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान

कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान
Pooja Sawant, Chinmay Udgirkar
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 10:40 AM

नाशिकः सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना नाशिकमधील अत्यंत मानाचा समजला जाणारा सुविचार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात अविरतपणे काम करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने सुविचार मंचतर्फे गौरव करण्यात येतो.

या मान्यवरांचा होणार गौरव

कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव विशेष पुरस्काराने सन्मानित येणार आहे. हेमंत राठी यांना जीवन गौरव पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ. अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांनाही सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

रविवारी कार्यक्रम

सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे व जेष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गोरवाडकर हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तींची निवड केली आहे. रविवार, 2 जानेवारी रोजी सांयकाळी 4 वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे व सचिव अॅड. रवींद्रनाना पगार यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोविडच्या सर्व निर्बंधाचे पालन केले जाईल, असेही कळवण्यात आले आहे.

सुविचार मंच

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये सुविचार मंचचे काम सुरू आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निस्पृह भावनेने या मंचचे सदस्य काम करत असतात. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते, विविध मान्यवर खूप चांगले काम करतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, यासाठी या मंचच्या वतीने विविध पुरस्कार दिले जातात. सध्या संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे व सचिव अॅड. रवींद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

इतर बातम्याः

फडणवीसांसोबत सरकार बनवण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का? शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया

आरोग्य, पर्यावरण मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त जागे; अखेर नवे निर्बंध लागू, जाणून घ्या नियम…

Aai Kuthe Kay Karte | देशमुखांच्या घरात अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाट! संगीत सोहळ्यात पाहायला मिळाली रेट्रो लूकची झलक!

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.