अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार, सूत्रांची माहिती

सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आज अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यांच्या या कृतीवर प्राजक्ता माळीने आक्षेप घेतल्याची माहिती आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार, सूत्रांची माहिती
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 11:11 PM

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा उल्लेख केला. प्राजक्ता माळी हिच्यासोबत सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना याचंही नाव सुरेश धस यांनी घेत टीका केली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना करुणा मुंडे यांनी देखील प्राजक्ता माळी यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर प्राजक्ता माळी हिला सातत्याने ट्रोल केलं जात होतं. प्राजक्ता माळी ही सर्वसामान्य मराठी कुटुंबातून अथक परिश्रम घेऊन पुढे आलेली मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिला सोशल मीडियावरुन सातत्याने ट्रोल केलं जात होतं. विशेष म्हणजे आज भाजप आमदार सुरेश धस यांनी तिचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल प्राजक्ता माळी हिने घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरशे धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार आहे. त्यामुळे सुरेश धस यांच्या आगामी काळात अडचणी वाढतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणाबाबत वेगवेगळे आणि धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी आज बीडच्या एसपींची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अनेक खळबळजक दावे केले. त्यांनी आज परळीत इव्हेंट मॅनेजमेंट कशापद्धतीने होतो याचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचं नाव घेतलं होतं. सुरेश धस यांनी केलेल्या या कृतीवर प्राजक्ता माळी हिने आक्षेप घेतला आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर कारवाई करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

“आकाची इथं 100 एकर जमीन आहे, तिकडे जमीन आहे, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही त्यांचे सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा पसार करावा”, असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.